नवाब मलिक यांच्या जावयाच्या अडचणीत वाढ! जामीन रद्द करण्यासाठी एनसीबी उच्च न्यायालयात

मुंबई, 15 ऑक्टोंबर 2021: महाराष्ट्राचे मंत्री नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांच्या अडचणी येत्या काही दिवसात वाढू शकतात.  खरं तर, नॉरकोटिक्स कंट्रोल ब्युरोनं (एनसीबी) त्यांच्या जामिनाविरोधात उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला आहे.  अमली पदार्थांच्या प्रकरणात अटक झालेल्या समीर खानला काही काळापूर्वी जामीन मिळाला होता.
नवाब मलिक यांनी काल पत्रकार परिषद घेऊन NCB वर गंभीर आरोप केले होते.  त्यांनी म्हटलं होतं की एनसीबीनं त्यांच्या जावयावर जाणून बुजून आरोप लावले आहे.  नवाब मलिक यांनी असंही म्हटलं होतं की, ज्याप्रकारे त्यांचे जावई अडकवले गेले होते, एनसीबीने आर्यन खानला (क्रूज पार्टी ड्रग्स केस) देखील अडकवलं आहे.
गेल्या वर्षी अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर बॉलिवूडमध्ये सुरू झालेल्या ड्रग्सच्या तपासादरम्यान नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांनाही NCB ने अटक केली होती.  त्यांना काही दिवसांपूर्वीच जामीन मिळाला होता.
नवाब मलिक यांनी NCB, भाजप नेत्यांवर केला हल्ला
 खरं तर, नवाब मलिक यांनी आर्यन खानशी संबंधित ड्रग्स प्रकरणात मनीष भानुशाली आणि केपी गोस्वामी यांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले होते, त्यांनी क्रूझवरील छापे बनावट असल्याचेही म्हटलंय.  त्यानंतर त्यांना लक्ष्य करण्यात आलं.
 कालच्या पत्रकार परिषदेत नवाब मलिक म्हणाले की, भाजप नेते म्हणत आहेत की मी या प्रकरणावर बोलत आहे कारण माझा जावई अमली पदार्थ तस्कर आहे.  अगदी माजी मुख्यमंत्री सुद्धा हे म्हणाले.  पण मला सांगा की माझ्या जावयाला 8 महिन्यांनंतर जामीन मिळाला आहे.
नवाब मलिक म्हणाले की, त्यांचा जावई खोट्या प्रकरणात अडकला आहे.  ते म्हणाले की, फर्निचरवालाजवळ फक्त साडे सात ग्रॅम गांजा, जो 200 किलो गांजा असल्याचे सांगितलं जात होतं.  सीएचा अहवाल आला की सापडलेली गोष्ट हर्बल तंबाखू आहे.  सर्वात मोठा प्रश्न उद्भवतो की इतकी मोठी एजन्सी NCB तंबाखू आणि गांजा मध्ये फरक करण्यास सक्षम नाही.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा