शिवसेना अ‍ॅक्शन मोडवर, तातडीने बोलावली मातोश्री वर बैठक

मुंबई, ६ सप्टेंबर २०२२ : मुंबई महानगरपालिकेची आगामी निवडणूक चांगलीच गाजणार आहे. कारण राज्यातील बदलत्या राजकीय समीकरणांचा परिणाम आत्ता येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकांवर दिसणार आहे. आत्ता या दरम्यान शिवसेना अ‍ॅक्शन मोडवर आली असून शिवसेनेने महानगरपालिका निवडणुकीसंदर्भात तातडीने बैठक बोलावली आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात झालेल्या बंडखोरीनंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकार पडलं आणि शिवसेनेला मोठा धक्का बसला कारण शिवसेनेच्या अनेक आमदारांनी भाजपसोबत जाऊन नवीन सत्ता स्थापन केली. या दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरेंना धक्या वर धक्काच देत आहेत.

केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी भाजपच्या मिशन मुंबई महापालिकेवरील विजयासाठी भाजपच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेत १५० च टार्गेट भाजपा च्या पदाधिकारी आणि आमदारांना दिले आहे. एवढेच नाहीतर पुढचा महापौर हा भाजपचाच असावा अशा सूचना देखील बैठकीत दिल्या आहेत.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत आज मातोश्रीवर शिवसेना विभागप्रमुखांची बैठक बोलावण्यात आली आहे. मुंबईतील सर्व विभागप्रमुख आणि विभाग महिला संघटक या बैठकीसाठी उपस्थित राहणार आहेत. एकिकडे मुंबई महापालिकेतील १५० जागांवर शिवसेनेचे नगरसेवक असणार असा निर्धार किशोरी पेडणेकर यांनी व्यक्त केला आहे तर केंद्रीय मंत्री अमित शाह नी देखिल १५० च टार्गेट भाजपा च्या पदाधिकारी आणि आमदारांना दिले आहे.

त्यामुळे होणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्या बैठकीत काय नियोजन होणार याकडे सर्वांचं लक्ष लागल आहे. खासदार अरविंद सावंत, सुनील राऊत, माजी महापौर किशोरी पेडणेकर, आमदार भास्कर जाधव तसेच मुंबईतील विभागप्रमुख आणि महिला संघटक या बैठकीसाठी उपस्थित आहेत. तर शिवसेनेच्या नेतेपदी नियुक्ती झाल्यानंतर भास्कर जाधव पहिल्यांदाज उद्धव ठाकरेंच्या भेटीला मातोश्रीवर आले आहेत. त्यामुळे आता भाजपला टक्कर देण्यासाठी शिवसेनेने देखील कंबर कसल्याचं दिसून येत आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी – वैभव शिरकुंडे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा