फिफा महिला फुटबॉल विश्वचषक २०२३ आजपासून सुरू होणार

सिडनी, ऑस्ट्रेलिया २० जुलै २०२३ : फिफा महिला फुटबॉल विश्वचषक २०२३ आजपासून सुरू होत आहे. महिला फुटबॉल विश्वचषक स्पर्धेची ही ९वी वेळ आहे. विशेष म्हणजे पहिल्यांदाच २ देश एकत्र या स्पर्धेचे आयोजन करत आहेत. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड हे, १ महिना चालणाऱ्या या स्पर्धेचे आयोजन करतील. आजपासून सुरू होणाऱ्या या स्पर्धेचा अंतिम सामना २० ऑगस्टला सिडनीच्या ऑलिम्पिक मैदानावर खेळवला जाणार आहे.

यावेळी विश्वचषकात एकूण ३२ संघ सहभागी होत आहेत. या स्पर्धेतील पहिला सामना न्यूझीलंड आणि नॉर्वे यांच्यात होणार आहे. न्यूझीलंडमधील ऑकलंड येथील ईडन पार्क येथे पहिला सामना म्हणून हा सामना खेळवला जाणार आहे. त्याचवेळी, आजचा दुसरा सामना ऑस्ट्रेलिया आणि आयर्लंड संघ यांच्यात सिडनीमध्ये होणार आहे.

महिला फुटबॉल विश्वचषकाच्या इतिहासात प्रथमच या स्पर्धेत ३२ संघ सहभागी होत आहेत. या संघांची प्रत्येकी ४ च्या ८ गटात विभागणी करण्यात आली आहे. ज्यामध्ये प्रत्येक गटातील टॉप-२ संघ राऊंड ऑफ १६ मध्ये प्रवेश करतील, जिथून बाद फेरीचे सामने खेळवले जातील. महिला फुटबॉल विश्वचषकात ९ स्टेडियम्समध्ये एकूण ६४ सामने खेळवले जाणार आहेत, ज्यामध्ये ऑस्ट्रेलियाच्या सिडनी, मेलबर्न, पर्थ, ब्रिस्बेन आणि अॅडलेड याशिवाय न्यूझीलंडच्या ऑकलंड, वेलिंग्टन, ड्युनेडिन आणि हॅमिल्टन येथे सामने होणार आहेत.

महिला फुटबॉल विश्वचषक २०२३ ची ट्रॉफी जिंकणाऱ्या संघाला यावेळी ३ पट अधिक बक्षीस रक्कम मिळेल. यावेळी विश्वचषक ट्रॉफी जिंकणाऱ्या संघाला ८६ कोटी रुपये मिळणार आहेत. त्याच वेळी, वर्ष २०१९ मध्ये, स्पर्धेची एकूण बक्षीस रक्कम ३० दशलक्ष होती, जी यावेळी ११० दशलक्षच्या जवळपास आहे.

स्पर्धेतील गट –
अ गट: न्यूझीलंड, नॉर्वे, फिलीपिन्स, स्वित्झर्लंड
ब गट: ऑस्ट्रेलिया, आयर्लंड, नायजेरिया, कॅनडा
क गट: कोस्टारिका, जपान, स्पेन, झांबिया
ड गट: इंग्लंड, हैती, डेन्मार्क, चीन
गट ई: यूएसए, व्हिएतनाम, नेदरलँड, पोर्तुगाल
गट एफ: फ्रान्स, जमैका, ब्राझील, पनामा
गट जी: स्वीडन, दक्षिण आफ्रिका, इटली, अर्जेंटिना
गट एच: जर्मनी, मोरोक्को, कोलंबिया, दक्षिण कोरिया

न्यूज अनकट प्रतिनिधी : सूरज गायकवाड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा