FIFA विश्वचषकात होणार ३६४१ कोटींचं वितरण, जाणून घ्या विजेत्या-उपविजेत्याला किती पैसे मिळणार ?

FIFA World Cup 2022 Winner, १७ डिसेंबर २०२२: कतार येथे आयोजित करण्यात येत असलेल्या FIFA विश्वचषक २०२२ हंगामातील दोन अंतिम फेरीतील संघ निश्चित झालेत. हे दोन्ही संघ अर्जेंटिना आणि गतविजेता फ्रान्स आहेत. या दोघांमध्ये रविवारी (१८ डिसेंबर) विजेतेपदाचा सामना रंगणार आहे.

अर्जेंटिना आणि फ्रान्स यांच्यातील हा सामना भारतीय वेळेनुसार रात्री ८.३० वाजता होणार आहे. आता चाहत्यांच्या मनात प्रश्न येत असंल की विजेत्या संघाला विजेतेपदासह बक्षीस म्हणून किती रक्कम मिळणार?

विजेत्या संघाला मिळणार एवढी रक्कम

दरवेळेप्रमाणे या वेळी देखील विजेत्या आणि उपविजेत्या सोबतच तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाच्या संघांना कोट्यवधी रुपये मिळणार आहेत. या संघांना किती रक्कम मिळते हे जाणून चाहत्यांना आश्चर्य वाटंल. ही रक्कम क्रिकेट विश्वचषक आणि इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) पेक्षा कितीतरी पटीनं जास्त आहे.

यावेळी संपूर्ण FIFA विश्वचषकात वितरित करण्यात येणारी बक्षीस रक्कम ४४० मिलियन डॉलर (सुमारे ३६४१ कोटी रुपये) निश्चित करण्यात आलीय. यामध्ये विश्वचषक विजेत्या संघाला ४२ मिलियन डॉलर (सुमारे ३४७ कोटी रुपये) मिळतील. मागील २०१८ च्या विश्वचषक स्पर्धेच्या तुलनेत ही रक्कम ४ मिलियन डॉलर्स जास्त आहे. तर उपविजेत्या संघाला ३० मिलियन डॉलर (सुमारे २४८ कोटी रुपये) दिले जातील.

उर्वरित संघांनाही करोडो रुपये मिळणार

विजेत्या आणि उपविजेत्या व्यतिरिक्त, तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर असलेल्या संघांनाही मोठी रक्कम दिली जाईल. फायनलच्या एक दिवस आधी म्हणजेच १७ डिसेंबरला एक सामनाही होणार आहे. क्रोएशिया आणि मोरोक्को या दोन्ही उपांत्य फेरीतील पराभूत संघांमध्ये हा सामना होणार आहे. विजयी संघ तिसऱ्या क्रमांकावर आणि पराभूत संघ चौथ्या क्रमांकावर प्रवास संपवेल. त्याच संदर्भात त्यांना बक्षिसाची रक्कमही दिली जाणार आहे.

या संघांना इतके पैसे मिळतील…

• विजेता – ३४७ कोटी रुपये
• उपविजेता – २४८ कोटी रुपये
• तिसरा क्रमांक संघ – २२३ कोटी रुपये
• चौथा क्रमांक – २०६ कोटी रुपये

बाकीच्या संघांना मिळंल इतकं बक्षीस

• विश्वचषक स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक संघाला ९-९ मिलियन डॉलर्स मिळतील.
उपांत्यपूर्व फेरीत पोहोचणाऱ्या संघांना १३ मिलियन डॉलर मिळतील

• उपांत्यपूर्व फेरीत पराभूत झालेल्या संघांच्या खात्यात १७ मिलियन डॉलर्स जमा होतील

जाणून घ्या कोणाला किती रक्कम मिळाली?

• ICC T20 विश्वचषक २०२२ जिंकणाऱ्या संघाला सुमारे १३ कोटी रुपये मिळाले.

• FIFA विश्वचषक २०२२ जिंकणाऱ्या संघाला सुमारे ३४२ कोटी रुपये मिळतील.

• आयपीएल २०२२ चा हंगाम जिंकणाऱ्या संघाला सुमारे २० कोटी रुपये मिळाले.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा