मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ अभियानांतर्गत जि. प. उच्च. प्रा. शाळा दगडवाडी, भोकरदन तालुक्यात प्रथम

भोकरदन, २३ फेब्रुवारी २०२४ : शालेय शिक्षण विभाग महाराष्ट्र शासन यांच्या वतीने राज्यस्तरीय मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हे अभियान राज्यभर दि १ जानेवारी ते १६ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत राबविण्यात आली आहे. भोकरदन तालुक्यातील एकूण २९९ जिल्हा परिषद शाळांनी सहभाग यामध्ये घेतला होता. यामध्ये राज्यशासनाने दिलेल्या निकषानुसार प्रथम केंद्र स्तरावर त्यानंतर तालुस्तरावर पथक नेमून शाळेची तपासणी झाली. यावेळी दानापुर केंद्रांतर्गत प्राथमिक शाळा दगडवाडी शाळेने केंद्रस्तरावर प्रथम क्रमांक मिळविला.

यानंतर लगेच भोकरदन तालुक्यातील १७ केंद्रातील शाळांची तालुकास्तरीय मूल्यांकन समितीने तपासणी करून शासन आदेशानुसार संपूर्ण निकष पूर्ण असलेल्या प्राथमिक शाळा दगडवाडी केंद्र दानापुर या शाळेने भोकरदन तालुक्यात प्रथम क्रमांक मिळविला असल्याचे नुकतेच जाहीर आहे. तालुकास्तरीय स्पर्धेत प्रथम क्रमांक आल्याने शाळा जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी पात्र झाली आहे. मा. शिक्षणाधिकारी प्राथमिक यांचे जिल्हास्तरीय मूल्यांकन पथकाने नुकतीच शाळेची तपासणी केली असता शाळेच्या परीसर व इतर बाबींची पडताळणी करून शाळेच्या कामकाजाबाबत समाधान व्यक्त केले असून शाळेचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ हे अभियान माझ्या शाळेत दिनांक १ जानेवारी २०२४ पासून ते १६ फेब्रुवारी २०२४ पर्यंत यशस्वीपणे राबवण्यात आले. शाळेचा सुंदर परिसर, सुंदर वर्ग सजावट, बोलक्या भिंती, परसबाग, वृक्षारोपण, हॅन्ड वॉश स्टेशन, स्काउट गाईड पथक, प्लास्टिक मुक्त परिसर, दप्तरमुक्त शाळा, क्षेत्र भेट, बचत बँक, ग्रंथालय अशा अनेक बाबींनी शाळा परिपूर्ण असून त्याचा फायदा या अभियानात आम्हाला झाला. या कामी शाळेतील सर्व शिक्षक, शालेय व्यवस्थापन समिती व सर्व गावकऱ्यांचे सहकार्य लाभले, असे मुख्याध्यापक श्री आर. एन. इंगळे यांनी प्रतिपादन केले आहे.

सदरील अभियान यशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री. आर. एन. इंगळे सर, प्रा. प. श्री. पुंडलिक सोनुने सर, प्रा. प. श्रीमती. जिजा. वाघ मॅडम, सहशिक्षक श्री. अशपाक शेख सर, श्री. गजेंद्र येवले सर, श्री. संदिप वायाळ सर यांनी विशेष मेहनत घेतली. या कामी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष, उपाध्यक्ष व सर्व सदस्य याचे विशेष सहकार्य लाभले. त्याचबरोबर गावकरी मंडळी, पालक यांनी सुद्धा सहकार्य केले. यावेळी माजी जि. प. सदस्या. श्रीमती. आशाताई मुकेशराव पांडे यांनी सर्व शिक्षकांचे अभिनंदन केले. तसेच गटशिक्षणाधिकारी श्री. शहागडकर साहेब, शिक्षण विस्तार अधिकारी श्रीमती. भिंगोले मॅडम, शिक्षण विस्तार अधिकारी श्री. बडगे सर, गट समन्वयक श्री. नेव्हार सर, दानापुर केंद्राचे केंद्र प्रमुख श्री. गणेश सोळुंके सर यांनी शाळेचे अभिनंदन व कौतुक केले.

न्यूज अनकट प्रतिनीधी : कमलकिशोर जोगदंडे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा