नागपूरमध्ये गुन्हेशाखा युनिट ३ कडुन घरफोडी करणाऱ्या आरोपीस अटक

नागपूर १७ मार्च २०२४ : ०६ मार्च रोजी नागपूरच्या पोलीस ठाणे कोराडी हद्दीत ,साक्षी प्रतिक्षा अपार्टमेंट, फ्लॅट नं. १०२, प्रेम नगर मध्ये घरफोडी झाली होती. नागपूर येथे राहणाऱ्या फिर्यादी आशा रायभान गजभिये, वय ४२ वर्षे, हया ईरा हॉस्पीटल लकडगंज, नागपूर येथे नोकरीवर असुन त्या आपले घराला कुलुप लावुन हॉस्पीटलला डयुटीवर गेल्या असता कोणीतरी अज्ञात चोरट्याने फिर्यादीचे घराचे मुख्य दाराचे कुलूप तोडुन, घरात प्रवेश करत घरातील बेडरूम मधील लाकडी आलमारीतून सोन्याचे दागिने आणि रोख ६५,०००/- रू असा एकुण अंदाजे १,६१,०००/-रू चा मुद्देमाल चोरून नेला. फिर्यादीने दिलेल्या तक्रारीवरून पोलीस ठाणे कोराडी येथे अज्ञात आरोपी विरूध्द कलम ४५४, ३८० भा.द.वि. अन्वये गुन्हा दाखल करून तपस सुरु करण्यात आला होता.

गुन्हयाच्या समांतर तपासादरम्यान गुन्हे शाखा, युनिट क. ३ चे अधिकारी व अंमलदार यांनी गोपनीय माहिती व तांत्रिक तपास करून आरोपी रोशन सेवकदास मेश्राम वय वर्ष ४१ वर्षे, रा. मिमटेकडी, आयबीएम रोड, गिट्टीखदान, नागपूर यास ताब्यात घेवुन विचारापुस केली असता, त्याने वर नमूद गुन्हा केल्याची कबुली दिली. आरोपीच्या ताब्यातुन गुन्हयातील सोन्याचे दागिने, रोख ८,०००/- रू व गुन्हयात वापरलेली मोटरसायकल असा एकुण किंमती अंदाजे २ लाख २७,०००/- रू चा मुद्देमाल जप्त केलाय. आरोपी व मुद्देमाल पुढील कारवाई करीता कोराडी पोलीसांचे ताब्यात दिला असून पुढील तपास सुरू आहे.

ही कामीगिरी मा. पोलीस उपआयुक्त (डिटेक्शन), सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे शाखा यांचे मार्गदर्शनात, गोनि, मुकुंद ठाकरे, गोउपनि मधुकर काठोके, सफौ. सतिश गांडे, दशरथ मिश्रा, गोहवा, विजय श्रीवास, संतोषसिंग ठाकुर, पो. जितेश रेड्डी, दिपक दासरवार, विशाल रोकडे, प्रमोद देशभ्रतार व दिपक लाकडे यांनी केली.

न्युज अनकट प्रतिनिधी : नीता सोनवणे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा