फलटण येथे रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा संपन्न

फलटण, ३१ जानेवारी २०२४ : फलटण येथे आज रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्याला प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आमदार बच्चू कडू उपस्थित होते. याप्रसंगी ते म्हणाले कि, अपंग व दिव्यांगांच्या न्याय हक्कासाठी आपण कायमच लढत असतो. फलटणमध्ये अपंग क्रांती संघटनेच्या वतीने आयोजित केलेला ॲम्बुलन्स सेवेचा लोकार्पण सोहळा हा एक आगळावेगळा उपक्रम आहे. अपंग निराधार व इतरांना आम्ही नेहमीच आमच्या पक्षाच्या माध्यमातून व संघटनेच्या माध्यमातून न्याय मिळवून देण्यात कुठेही कमी पडत नाही जर अपंगांना कधीही अडचण आली तर केव्हाही फोन करा. मी नेहमी तुमच्या पाठीशी आहे त्याचबरोबर दिव्यांग आणि अपंग बांधवांना आम्ही शासनाच्या माध्यमातून लवकरच घरकुल योजना मंजूर करणार असल्याचे प्रतिपादनही आमदार बच्चू कडू यांनी व्यक्त केले.

आमदार बच्चू कडू यांचे आगमन होताच कार्यकर्त्यांनी फटाक्याच्या आतिषबाजी करत त्यांचे फलटण शहरात स्वागत केले. प्रथम श्रीफळ फोडून रुग्णवाहिकेचा शुभारंभ केला. कार्यक्रमाचे स्वागत तालुकाध्यक्ष सागर गावडे पाटील यांनी केले तर सूत्रसंचालन आनंद पवार यांनी केले. या कार्यक्रमास मोठ्या संख्येने प्रहारचे कार्यकर्ते, ग्रामस्थ महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या कार्यक्रमासाठी अपंग क्रांतीचे जिल्हाध्यक्ष मा. अमोल कारंडे, कार्याध्यक्ष मा. प्रशांत बगले, मनोज माळी, गौरव (दादा) जाधव, प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष मा. अरविंद पिसे, मंगेश धमाळ, महेश शिंदे, दस्तगीर पठाण, युवा नेते सह्याद्री (भैय्या) कदम, विडणी गावाचे लोकनियुक्त सरपंच सागर अभंग, श्रीराम बाजार संचालक मा. मारुती गावडे, गोखळी गावाचे माजी सरपंच मा. नंदकुमार गावडे, माजी उपसरपंच मा. अभिजित जगताप, शिवसेना तालुका प्रमुख मा. विकास नाळे, गोखळी सोसायटी संचालक मा. उदयसिंग गावडे, गोखळी पोलीस पाटील मा. विकास शिंदे, हनुमान सोसायटी माजी चेरमन मा. ज्ञानदेव कदम, इत्यादी प्रमुख उपस्थित होते तसेच प्रहार जनशक्ती पक्षाचे फलटण तालुकाध्यक्ष मा. सागर गावडे पाटील, जिल्हा कार्यालय प्रमुख तथा तालुकाप्रमुख मा. महेश जगताप, सुभाष मुळीक, बापूराव खरात, अशोक गोतपागर, चंद्रकांत नाळे, महेंद्र गावडे, चंद्रकांत निंबाळकर, सुनील तोडकर, दत्तात्रय पवार, संग्राम इंगळे, रमेश शिंदे, राजेंद्र फाळके, रेश्मा तोरसे, धनश्री गिरीगोसावी उपस्थित होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी :आनंद पवार

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा