नाशिक शहरात कोरोनाने घेतला गर्भवती महिलेचा जीव

नाशिक, दि.५ मे २०२० : मालेगाव पाठोपाठ आता नाशिक शहरातही कोरोनाचा पहिला बळी गेला आहे. नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयात ३ दिवसांपूर्वी एका गर्भवती महिलेचा मृत्यू झाला होता. शहरातील बजरंगवाडी येथून आलेल्या या गर्भवती महिलेला कोरोनाची लागण झाल्याचं आज(मंगळवारी) सकाळी स्पष्ट झालं असल्याने या महिलेचा मृत्यू झाला आहे.अशी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ सुरेश जगदाळे यांनी सांगितले आहे.

बाळंतपणासाठी ही महिला २८ एप्रिल रोजी सिन्नरवरून नाशिकला आली होती. त्यानंतर तिला त्रास होऊ लागल्याने नातेवाईकांनी तात्काळ जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. मात्र उपचार सुरू असताना या महिलेचा ३ दिवसांपूर्वीच मृत्यू झाला आहे.

तिचा घशाचा नमुना घेण्यात आला होता. मात्र आज सकाळी त्या महिलेचा अहवाल पॉजिटीव्ह आढळून आला आहे.
याशिवाय सिन्नरमध्येही कोरोनाचे रुग्ण असून ही महिला सुद्धा सिन्नरवरून नाशिकला आली होती. त्यामुळे सिन्नरमधूनच ही गर्भवती महिला कोरोना बाधित असावी असा अंदाज लावला जात आहे. सिन्नरला सध्या ५ कोरोना बाधित रुग्ण आहेत.
ही महिला शहरातील बजरंगवाडी येथे आल्यानंतर आणखीही काही ठिकाणी गेली असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे मनपा आरोग्य विभागासमोर मोठं आव्हान उभे राहिले आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी:

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा