कोरोनाचा वेग वाढला; गेल्या २४ तासांत देशात १०,१५८ नवीन रुग्णांची नोंद, तर सक्रिय रुग्ण ४५ हजारांवर

दिल्ली, १३ एप्रिल २०२३: कोरोनाच्या सक्रिय रुग्णसंख्येत दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसून येतेय. गेल्या २४ तासात देशात तब्बल १०,१५८ कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची नोंद झालीय. रुग्णवाढीचा हा आकडा चिंताजनक असून केंद्र सरकारकडून वेळीच उपाययोजना करण्यात येत आहेत. दरम्यान या आकडेवारीसह देशातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा ४४,९९८ इतका झालाय. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांनी आरोग्याची काळजी घेत मास्क वापरण्याचं आवाहन सरकारकडून करण्यात येतंय.

दरम्यान, देशात २४ तासांत कोरोनाचे १०,१५८ रुग्ण नोंदवण्यात आले असून, गेल्या सात महिन्यांतील हा उच्चांक आहे. हे आकडे आरोग्य मंत्रालयाने जाहीर केल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे. संसर्गाचं प्रमाण सातत्याने वाढत आहे, परंतु रूग्णांच्या रुग्णालयात दाखल होण्याचं प्रमाण खूपच कमी आहे. पण आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, कोरोनाच्या नवीन एक्सबीबी १.१६ प्रकारामुळं प्रकरणं वाढत आहेत, परंतु काळजी करण्यासारखं काही नाही आणि विषाणूविरूद्ध लस प्रभावी आहे.

ओमिक्रॉनच्या सबवेरियंट एक्सबीबी १.१६ चा प्रसार वेगाने वाढलाय. त्याचा प्रसार फेब्रुवारीमध्ये २१.६% होता, जो मार्चमध्ये ३५.८% वर पोहोचला. मात्र कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी १० एप्रिल रोजी देशभरातील अनेक सार्वजनिक आणि खाजगी रुग्णालयांमध्ये सुविधांच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी मॉक ड्रिल घेण्यात आलं. दरम्यान, आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी राम मनोहर लोहिया रुग्णालयात पोहोचून या परिस्थितीचा आढावा घेतला.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सूरज गायकवाड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा