भाजप खासदार अर्जुनलाल मीणा यांची चर्चा; दोन्ही पत्नींसोबत करवा चौथ सण साजरा

उदयपूर, १४ ऑक्टोबर २०२२: देशभरात गुरुवारी करवा चौथ हा सण उत्साहात साजरा करण्यात आला. या दिवशी पत्नी आपल्या पतीला ओवाळतात आणि त्याच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना देखील करतात.

राजस्थानमधील उदयपूर येथील भाजप खासदार अर्जुनलाल मीणा सध्या सर्वाधिक चर्चेचा विषय बनले आहेत. कारण या खासदार महाशयांना दोन पत्नी असून त्यांनी आपल्या दोन्ही पत्नींसोबत करवा चौथचा सण साजरा केला.

भाजप खासदार अर्जुनलाल मीणा यांच्या दोन्ही पत्नी बहिणी आहेत. एका पत्नीचे नाव राजकुमारी तर दुसऱ्या पत्नीचे नाव मीनाक्षी आहे. राजकुमारी या शिक्षिका आहेत तर मीनाक्षी या गॅस एजन्सीच्या मालक आहेत. दरम्यान, करवा चौथच्या दिवशी खासदार मीणा आपल्या दोन्ही पत्नींसोबत सण साजरा करतानाचा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये खासदार अर्जुनलाल मीणा आपल्या दोन्ही पत्नींसोबत करवा चौथचा सण साजरा करताना दिसत आहेत.

कोण आहेत अर्जुनलाल मीणा ?

अर्जुनलाल मीणा हे राजस्थानमधील २५ खासदारांपैकी एक आहेत. अर्जुनलाल मीणा यांनी राजस्थानच्या मोहनलाल सुखाडिया विद्यापीठातून एमकॉम, बीएड आणि एलएलबी पदवी पूर्ण केली आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत मीणा यांना उदयपूरच्या जनतेने संसदेत निवडून दिले आहे. त्यापूर्वी २०१४ मध्ये खासदार म्हणून ते पहिल्यांदा निवडून आले होते. तर २००३ ते २००८ या काळात ते आमदारही होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा