सीए इन्स्टिट्यूटतर्फे आयोजित शिबिरास चांगला प्रतिसाद!

रत्नागिरी,०९ डिसेंबर २०२२ :दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकौंटंटस ऑफ इंडियाच्या रत्नागिरी शाखेतर्फे बुधवारी रेरा, जीएसटी आणि चॅरिटेबल ट्रस्ट याविषयी एकदिवसीय मार्गदर्शन शिबिर घेण्यात आले. मारुती मंदिर येथील हॉटेल व्यंकटेश येथे झालेल्या या शिबिराला रत्नागिरीतील सीएंचा चांगला प्रतिसाद मिळाला.

या शिबिरात कोल्हापूर येथील सीए संजय व्हनबट्टे यांनी सार्वजनिक न्यास व शैक्षणिक संस्था संदर्भातील सर्वोच्च न्यायालयाच्या काही निर्णयांवर सखोल विवेचन केले. तसेच रेरा कायद्यांतर्गत सीएनी द्याव्या लागणाऱ्या फॉर्म ३ व फॉर्म ५ यासंदर्भातील तरतुदी विषद केल्या.

तर दुपारच्या सत्रात सीए वैभव देवधर यांनी ट्रस्ट व चॅरिटेबल संस्था यांना जीएसटी कायद्यातील तरतुदी व सवलती कशा लागू आहेत, हे सविस्तर सांगितले. सीए चैतन्य वैद्य यांनी जीएसटी कायद्यातील स्क्रुटिनी अॅसेसमेंट संदर्भातील तरतुदी मांडल्या. अॅसेसमेंट व विवरणपत्र वेळेत न भरणाऱ्या करदात्यांवरील कारवाई याबाबतीतील सखोल विवेचन त्यांनी आपल्या सत्रात केले.

या वेळी शाखाध्यक्ष सीए प्रसाद आचरेकर, उपाध्यक्ष सीए मुकुंद मराठे, विकासा चेअरमन सीए अभिलाषा मुळ्ये आणि शाखेचे सचिव सीए अक्षय जोशी, खजिनदार सीए केदार करंबेळकर, कमिटी मेंबर सीए शैलेश हळबे उपस्थित होते. सीए वरद पंडित यांनी सूत्रसंचालन केले. तर सीए अभिलाषा मुळ्ये यांनी आभार मानले.

न्यूज अनकट प्रतिनिधी : जमीर खलफे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा