गुटका आणि कॅन्सर…आणि कारवाई

पुणे, १९ जुलै २०२२: गुटखा हा कॅन्सरचा परममित्र मानला जातो. २० जुलै २०१२ रोजी, गुटखा बंदी करण्यात आली. पण आज दहा वर्षानंतर गुटखा खणाऱ्यांची संख्या आणि कॅन्सरग्रस्त लोकांची संख्या कमी होत नाही. सर्वेक्षणानुसार असे दिसून आले आहे की, मजूर लोकांमध्ये स् स्रियांबरोबर, लहान बाळांनादेखील गुटखा दिला जातो. ज्यामध्ये असलेल्या अफूमुळे लहान मुलांना दिवसभर झोप लागून रहाते. पण याचा परिणाम व्यसनातही होतो आणि नंतर कॅन्सरमध्ये होतो.
गुटख्याच्या विळख्यात शाळा परिसर, रुग्णालयातले परिसर अडकला आहे. ज्याचा परिणाम हा कॅन्सरमध्ये होतो. गुटख्यामध्ये सुपारीवर प्रक्रिया करुन त्यात मॅग्नेशिअम, कार्बोनेटसारखे घातक घटक असतात. ज्यामुळे गुटखा हा सगळ्यात जास्त हानीकारक मानला जातो.

८० टक्के लोकं ही व्यसनाधीन असल्याने कॅन्सरचे शिकार होतात. त्यातही गावाकडच्या लोकांमध्ये शहरापेक्षा हे प्रमाण जास्त असते. गुटख्याच्या पाकिटाची किंमत ही खिशाला परवडणारी असल्याने त्याचा खप जास्त होतो, असे मत पानविक्रेत्यांनी व्यक्त केले.
दुसरीकडे व्यसन आणि सवय या दोन्हींचा मेळ गुटख्यामधून साधला जात असल्याचे पुण्यातल्या मजूरांचे म्हणणे आहे.

कारवाईचं काय?

२० जुलै २०१२ ला गुटखाबंदी जाहीर झाली. मात्र अजूनही सर्व टपर्‍यांवर सर्रास गुटखा विकला जातो. त्यातही न दिसण्यासाठी तो कागदात गुंडाळून दिला जातो. कर्नाटकात गुटखा बंदी नसल्याने तिथून थेट गुटखा महाराष्ट्रात पोहोचवला जातो. यात गुटखा, सुगंधित तंबाखू, गांजा अशा पदार्थांची खुले आम देवाण घेवाण होत आहे. याचे प्रमाण अतिशय भयानक आहे. दिवसाला ५० के ६० ग्राहक किमान दोनशे पुड्या खरेदी करत असल्याने आणि त्याचे रुपांतर कॅन्सरमध्ये होत असल्याने त्याचे प्रमाण नक्कीच गंभीर आहे.

कारवाई करण्यासाठी पुरेसे मानवी बळ नाही. पाच प्रांतासाठी मिळून केवळ १० अधिकारी असल्याने कारवाई कधी, कुठे आणि कशी करणार हा एक मोठा प्रश्न आहे. त्यातही पानटपरीवाल्यांनी स्वत:च्या कमाईपोटी अधिकाऱ्यांना मदत करण्याऐवजी केवळ विक्रीवर भर दिल्याने कारवाईला कायम अडथळा निर्माण होत आहे.

कॅन्सर-

गुटख्यामुळे तोंडाचा कॅन्सर होतो. ज्यात थेट तोंडाचा तेवढा भाग काढून टाकावा लागतो. दात काढून चेहरा विद्रूप होण्याची यात शक्यता असते. हिरड्या कायमच्या निकामी होऊ शकतात. त्यामुळे हा कॅन्सर अतिशय घातक समजला जातो.

पण आता हे सगळं रोखावं कसं हा प्रश्न प्रशासनापुढे पडला आहे. कोणी मदतही करत नाही आणि कोणी माहिती पुरवत नाही. काम करावे तर कसे? या प्रश्नाने प्रशासन बेजार आहे. तर अशिक्षितपणे गुटखा खाणाऱ्यांना रोखणार कोण हादेखील प्रश्न आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी- तृप्ती पारसनीस

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा