आदित्य ठाकरेंच्या या कामाचं आनंद महिंद्रा यांनी केलं कौतुक

मुंबई, 18 एप्रिल 2022: महिंद्रा समुहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांनी मुंबईच्या बस स्टॉपचं नूतनीकरण केल्याबद्दल महाराष्ट्राचे मंत्री आदित्य ठाकरे यांचं कौतुक केलंय. याबद्दल महाराष्ट्राचे पर्यटन आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी महिंद्रा यांचे आभार मानले आहेत. ठाकरेंसोबत, महिंद्रा यांनी देशाच्या औद्योगिक राजधानीतील बस स्टॉपचं चित्र पूर्णपणे बदलल्याबद्दल बीएमसी आयुक्त इक्बाल सिंग चहल यांचंही कौतुक केलंय.

हे लिहिलं महिंद्रांनी

आनंद महिंद्रा यांनी ट्विट केलं, “शेवटी मुंबईत वर्ड क्लास दर्जाचे बस स्टॉप असतील… एक्सरसाइज बार आणि ‘कूल’ ग्रीन छत यांसारखी इनोवेटिव फीचर्स पाहून आनंद झाला. व्वा आदित्य ठाकरे, इक्बाल सिंग चहल.”

आदित्य ठाकरे यांचं उत्तर

यानंतर, आदित्य ठाकरे यांनी आनंद महिंद्रा यांचं ट्विट रिट्विट केलं आणि लिहिलं, “धन्यवाद आनंद महिंद्रा जी. आमच्या शहरांसाठी आरामदायी सार्वजनिक वाहतूक सुनिश्चित करणं आणि डिझाइन एस्थेटिक्स अधिक चांगल्या प्रकारे समजून घेणं हा यामागील उद्देश आहे. म्हणून जेव्हा आम्ही आमच्या बसेसच्या ताफ्यात एसी इलेक्ट्रिक जोडू. बसेसची संख्या वाढवताना, आम्ही हे देखील सुनिश्चित करत आहोत की आमचे बस स्टॉप सर्व नागरिकांसाठी अधिक चांगले असतील.”

प्रतिक्रिया देत आहेत युजर्स

महिंद्रा यांच्या ट्विटवर यूजर्स त्यांच्या प्रतिक्रिया देत आहेत. त्यांच्या या ट्विटवर @csankush111 यूजर आयडी असलेल्या एका व्यक्तीने लिहिलं की, “एक्ससाइज बार ‘मस्त’ आहे, पण मी ग्रीन रूफशी सहमत नाही. त्यात पाणी टाकून त्याची देखभाल करण्याचं काम कोण करेल. तुम्ही छतावर सोलर पॅनेल लावा.” जर तुम्ही असं केलं असतं तर तुम्ही वीज निर्माण करू शकला असता आणि त्यातून इलेक्ट्रिक होर्डिंग चालवू शकला असता. यामुळं अतिरिक्त उत्पन्न मिळालं असतं.”

हे ट्विट रिट्विट करत आनंद महिंद्रा यांनी लिहिलं, “चांगला प्रश्न, मी देखील हा प्रश्न विचारला आहे. वरवर पाहता या बस स्टॉप ला आणि उद्यानांच्या आसपासच्या काही बस स्टॉप वर ग्रीन रुफ आणि साइड बार असतील कारण ही मोकळी जागा आहे. मात्र ज्या ठिकाणी शक्य असेल त्यावर सोलर पॅनल बसवले जातील. या उपक्रमाचा मुख्य उद्देश क्लीन बस स्टॉप असणं हा आहे.”

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा