पुरंदर, दि.२१ ऑक्टोबर २०२०: अवघ्या महारष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडोबाच्या गडावर शारदीय नवरात्र उत्सवा निमित्त आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. कोरोनामुळे भाविकांना देव दर्शनसाठी परवानगी नसली तरी देवाचे नित्योपचार मात्र नेहमी प्रमाणे सुरू आहेत.
जेजुरी येथील मल्हार गडावर नवरात्रीला वेग वेगळे कार्यक्रम असतात.नऊ दिवस हा उत्सव साजरा करण्यासाठी जेजुरी ग्रामस्थांबरोबरच राज्यातून अनेक भाविक जेजुरीत येत असतात.यावर्षी मात्र कोरोनामुळे शासनाने हे सर्व उत्सव रद्द केले आहेत.
जेजुरी गडावर पुजारी मानकरी सेवेकरी यांच्या उपस्थितीत शनिवारी घट स्थापना करून नवरात्र उत्सवास सुरवात करण्यात आली आहे.या निमित्त जेजुरीच्या या गडावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.
रस्त्यावरून जाणाऱ्या लोकांना ही आकर्षक रोषणाई पाहायला मिळते आहे.तर या रोषणाईमुळे हा संपूर्ण गडपरिसर व मंदिर उजळून निघाले आहे.आकर्षक असलेली ही रोषणाई दर वर्षी प्रमाणे या वर्षी मात्र भविकांना पाहता येत नाही.
न्यूज अनकट प्रतिनिधी: राहुल शिंदे