मी पार्श्वगायिका अनुराधा पौडवाल यांची मुलगी करमला मॉडेक्स यांचा दावा

तिरुवनंतपुरम : केरळमधील तिरुवनंतपुरम येथे राहणाऱ्या एका ४५ वर्षीय करमला मोडेक्स या महिलेने प्रसिद्ध पार्श्वगायिका अनुराधा पौडवाल यांची मुलगी असल्याचा दावा केला आहे. याबाबत जिल्हा कौटुंबिक न्यायालयामध्ये खटला देखील दाखल केला आहे. त्यामुळे चर्चेला उधाण आलं आहे. याबाबत या महिलेने याचिका दाखल केली आहे.

अनुराधा पौडवाल यांनी १९७४ मध्ये आपला जन्म झाला. त्यानंतर केवळ ४ दिवसांची असताना पालक आई-वडिल पोन्नाचन आणि एग्नेस यांच्याकडे आपल्याला सोपावल्याचा दावा मोडेक्स यांनी आपल्या याचिकेत केला आहे.

याबाबत करमला मोडेक्स म्हणाल्या, ‘अनुराधा पौडवाल यांनी पार्श्वगायनाचं खूप काम बाकी असल्याचं कारण सांगत लहान मुलाला सांभाळ करण्यास असमर्थता दाखवली होती.
त्यावेळी त्यांनी पद्मश्री आणि राष्ट्रीय फिल्म पुरस्काराने सन्मानित अनुराधा पौडवाल यांनी संगीतकार अरुण पौडवाल यांच्याशी लग्न केलं होतं.

याबाबत करमला यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं की, ‘जवळपास ४-५ वर्षांपूर्वी माझे पालक वडील पोन्नाचन यांनी मृत्यू होण्याआधी माझी जन्मदाती आई अनुराधा पौडवाल असल्याचं मला सांगितलं आहे. मी ४ दिवसांची असताना मला माझे पालक पोन्नाचन यांच्याकडे सोपवण्यात आलं. पोन्नाचन त्यावेळी महाराष्ट्रात सैन्यात तैनात होते. त्यांची अनुराधा पौडवाल यांच्याशी मैत्री होती. काही काळाने त्याची केरळमध्ये बदली झाली.’

पोन्नचन यांनी आपल्या मृत्यूआधी अंतरात्म्यावरील ओझं कमी करण्यासाठी करमला यांना त्यांच्या खऱ्या आईबद्दल सांगितल्याचंही करमला म्हणाल्या. विशेष म्हणजे करमला यांच्या पालक आई एग्नेस यांनाही ही मुलगी गायिका अनुराधा पौडवाल यांची असल्याबद्दल माहिती नव्हती. करमला आणि एग्नेस यांना तीन मुले आहेत. त्यांनी करमाला यांना आपलं चौथं अपत्य म्हणूनच वाढवलं. एग्नेस सध्या 82 वर्षांच्या असून सध्या स्मृतीभ्रंशाने ग्रस्त आहेत. त्यामुळे एकूणच हे प्रकरण गुंतागुंतीचं झालं आहे.

पालक वडिलांनी आपल्याला जन्मदात्या आईविषयी सांगितल्यानंतर आपण त्यांना फोन करुन अनेकदा संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी असं काही मानण्यास नकार दिला. तसेच नंतर आपला फोन नंबरही ब्लॉक केल्याचा दावा करमाला यांनी केला आहे. आता आम्ही याविषयी कायदेशीर मार्गाने लढण्याचा निर्णय घेतला आहे. त्या माझी आई आहेत आणि मला त्या परत हव्या आहेत, असंही मत करमाला यांनी व्यक्त केलं आहे.

करमाला यांचे वकील अनिल प्रसाद म्हणाले, ‘तिरुवनंतपुरममधील जिल्हा कौटुंबिक न्यायालयात 27 जानेवारी रोजी या प्रकरणावर सुनावणी होणार आहे. यावेळी अनुराधा पौडवाल आणि त्यांच्या दोन मुलांना स्वतः हजर राहण्यास सांगण्यात आलं आहे. अनुराध पौडवाल आणि त्यांच्या मुलांशी आधी संपर्क करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, त्यांनी कोणताही सकारात्मक प्रतिसाद दिला नाही.’

करमाला यांनी आपल्याला ज्या प्रकारच्या बालपणाचा हक्क मिळायला हवा होता तो नाकारल्याने आपल्या कथित जन्मदात्या आई वडिलांकडे ५० कोटी रुपयांच्या भरपाईची मागणीही केली आहे. तसेच पौडवाल यांच्याशी संबंधित सर्व संपत्तीच्या विक्रीवरही स्थगिती लावण्याची मागणी केली आहे. जर अनुराध पौडवाल आणि त्यांच्या पतींनी आमचा दावा फेटाळला, तर आम्ही त्यांची डीएनए चाचणी करण्याची मागणी करणार असल्याचंही करमाला यांचे वकील अनिल प्रसाद यांनी म्हटलं आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा