राष्ट्रीय प्रशीक बाल सन्मान पुरस्कार जाहीर, कोल्हापूरच्या सहा बाल कलाकारांचा समावेश

कोल्हापूर, १२ जून २०२३ : समाजात अनेक गुणवंत, सजग व नवनिर्मितीक्षम क्षमता असणारी लहान मुलं-मुली वावरतांना दिसतात. त्यांच्यात नव काहीतरी करण्याची उर्मी असते. यातील अनेक लहान मुला-मुलींनी आपल्या छोट्याश्या आयुष्यात कला, संस्कृती, साहित्य, क्रीडा व इतर क्षेत्रात आपल्या कुवती प्रमाणे काहीतरी दखलपात्र आगळे-वेगळे केलेले असते. अशाच नावलौकिक प्राप्त केलेल्या गुणवंत बालकांना राष्ट्रीय प्रशीक बाल सन्मान पुरस्कार दिला जातो.

प्रशीक म्हणजे प्रज्ञा, शील व करुणा या तत्वांना बांधिल मानून कलेल्या क्षेत्रात नावलौकिक मिळवलेल्या आदित्य म्हमाने याच्यासह तक्ष उराडे, कनिष्का खोबरे, अमिरत्न मिणचेकर, स्वरल नामे, अतिफ काझी, मंथन जगताप (कोल्हापूर) यांच्यासह स्वरा सामंत, आर्य तेटांबे, श्रावस्ती तामगाडगे (मुंबई), अवंती आणि अन्वेश मोखले (पुणे), राजकन्या कोळी (सांगली) यांच्यासह महाराष्ट्रातील पंधरा बाल कलाकारांचा या राष्ट्रीय पुरस्कारासाठी निवड करण्यात आल्याची माहिती पत्रकार परिषदेमध्ये बालसाहित्य कलामंचच्या डॉ. स्नेहल माळी आणि अनिरुद्ध कांबळे यांनी दिली.

राष्ट्रीय प्रशीक बाल सन्मान पुरस्कार-२०२३ या पुरस्काराचे स्वरूप मानाचा फेटा, सन्मानचिन्ह आणि पाच हजार रुपयांची पुस्तके असे असून या पुरस्काराचे वितरण रविवारी १८ जूनला, दुपारी १२ वाजता राजर्षी शाहू स्मारक भवन, दसरा चौक, कोल्हापूर येथे होणाऱ्या राजर्षी राष्ट्रीय बाल लघु चित्रपट महोत्सवात होणार आहे. हा पुरस्कार सोहळा आमदार सतेज उर्फ बंटी पाटील, आमदार जयंत आसगावकर, विद्रोही शाहीर संभाजी भगत, प्रा. डॉ. बाबुराव गुरव, अभिजित बिचुकले, विजया कांबळे, छाया पाटील, दिग्दर्शक माहेश्वर तेटांबे, छायाचित्रकार राजवीर जाधव, अमर पारखे आदी मान्यवरांच्या हस्ते होणार आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी – अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा