जागतिक एडस् दिनाच्या निमित्ताने

साल २००९, एक एचआयव्हीबाधित मुलगा आपल्या पालकांसोबत , एक एचआयव्ही बाधित मुलगी आपल्या पालकांसोबत एचआयव्ही बाधित वधू-वर मेळाव्याला उपस्थित होती. मेळाव्यात एकमेकांना दोघे पसंत पडले आणि मेळाव्यानंतर त्या दोघांचा विवाह पार पडला. हे सांगण्याचं निमित्त म्हणजे १ डिसेंबर हा जागतिक एड्स दिवस म्हणून मानला जातो. त्या निमित्ताने अक्षदा विवाह संस्था २००९ पासून एचआयव्ही बाधितांचा वधू-वर मेळावा आयोजित करत असते. एचआयव्ही बाधितांनाही सुखाचा संसार करण्याचा हक्क आहे, हे या उपक्रमातून अक्षदा विवाह संस्थेने दाखवून दिले आहे.
एचआयव्ही होणाऱ्या रुग्णांमध्ये खास करुन देह विक्रीय करणाऱ्या स्त्रियांचा समावेश असतो. अशा स्त्रियांना समाज वाळीत टाकतो. यांना एचआयव्ही बाधित झाल्यानंतर यांचे आयुष्य म्हणजे जिवतंपणीच नरकयातना भोगण्यासारखे असते. अशांना आयुष्याचा जोडीदार मिळवून देऊन त्यांना आयुष्य सुखाने व्यतीत करण्याचा अधिकार आहे, यासाठी अक्षदा विवाह संस्था काम करत आहे. महत्वाचे म्हणजे या मेळाव्यातून किंवा या प्रकारचे विवाह जुळवताना संस्थेच्या सहकार्याने कायदेशीर व धार्मिक बाबी पूर्ण करुन दिल्या जातात. जेणे करुन कुठल्याही प्रकारची अडचण जोडप्यांना विवाहानंतर सतावू नये,हा यामागचा उद्देश असल्याचे अक्षदा विवाह संस्थेचे संचालक डॅा. राजेंद्र भवाळकर यांनी सांगितले.
या कार्यात त्यांना माजी आमदार मेधा कुलकर्णी ,कुटुंब न्यायालयातील समुपदेशक स्मिता जोशी,अँडव्होकेट प्रार्थना सदावर्ते,मानव्य संस्थेचे शिरिष लवाटे,जेष्ठ समाजसेविका रेणुताई गावस्कर,रोटरीचे प्रांतपाल.डाँ.महेश कोटबागी,डाँ.दिपक पुरोहीत,सध्याचे प्रांतपाल मा.पंकज शहा आदींचा या मार्गदर्शन लाभले आहे. विवाहापूर्वी एकमेकांना पसंत केल्यानंतर त्यांचे समुपदेशन ते विवाहापर्यंतची संपूर्ण जबाबदारी अक्षदा विवाह संस्था पार पाडते. समुपदेशनाचे माफक शुल्क आकारले जाते. आश्रयदाते किंवा रोटरी परिवारातुन सहकार्य मिळाल्यास  विवाह  मोफत केला जातो. दोन एचआयव्ही पोझिटीव्ह विवाहानंतर योग्य उपचार घेतल्यास होणारे मूल हे एचआयव्ही निगेटीव्ह होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
जगात ८० लाख एचआयव्हीबाधित असून सध्या मृत्यूदर  कमी होतो आहे. त्यासाठी विविध औषधोपचार शोधण्याचे काम सुरु आहे. एचआयव्ही  हा संसर्गाने पसरतो असे अनेक गैरसमज या अशा उपक्रमातून दूर करण्याचा संस्थेचा हा उपक्रम नक्कीच स्तुत्य आहे. आजपर्यंत .सुमारे ६५०…. विवाह जुळवले असून यातील अनेक विवाह हे विधवा विधुर घटस्फोटितांचे असुन बरेचसे विवाह हे आंतरजातीय होताना दिसतात. आम्हालाही आनंदाने जगण्याचा हक्क आहे, हे या जागतिक एड्स दिनाच्या निमित्ताने सांगण्याचा संस्थेचा उपक्रम नक्कीच वाखाणण्याजोगा आहें. मात्र समाज काय म्हणेल याचा विचार करुन पुण्यातील अशा मेळाव्यांमधुन स्थानिक वधुवरांचा सहभाग कमी असतो याची सल कायमच राहील.
न्युज अनकट प्रतिनिधी : तृप्ती पारसनीस

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा