मुंबई: राज्यात विधानसभेची मुदत संपून काही दिवस उलटले आहेत.तरीही सत्ता स्थापनेचा तिढा अद्यापही सुटलेला नाही. त्यातच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्यातील सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजपला सत्तास्थापनेसाठी निमंत्रण दिले आहे.
त्यामुळे राज्यात राजकीय हालचालींना प्रचंड वेग आला आहे. एकीकडे भाजपने सत्ता स्थापनेसाठी जोरदार प्रयत्न सुरु केले असताना दुसरीकडे भाजपला खिंडीत पकडण्याचा प्रयत्न केला जात आहे. यासाठी राष्ट्रवादीकडून चांगलीच योजना आखण्यात आली आहे. यामुळे भाजप सरकार स्थापन करु शकणार नाही. तसेच राष्ट्रवादी शिवसेनेला पाठिंबा देण्यास इच्छुक असल्याचेही वृत्त आहे.
यासाठी शरद पवारांचा हा ‘मास्टर प्लान’ असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. जर भाजपने सत्ता स्थापन करण्याचा प्रयत्न केला तर आम्ही त्यांच्याविरोधात मतदान करु. असं थेट वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि प्रवक्ते नवाब मलिक यांनी केलं आहे.
त्यामुळे आता भाजपला सत्ता मिळू नये. यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस सर्व प्रयत्न करणार असल्याचे चित्र आहे. एकीकडे राष्ट्रवादीकडून भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न केले जात आहेत. दुसरीकडे शिवसेनेला मात्र राष्ट्रवादी मदत करण्याचे असल्याचे संकेतही दिले जात आहे.