नाशिकच्या ऑफ ट्रॅक रेल कोच रेस्टॉरंटच्या उद्घाटनाला केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांची उपस्थिती

नाशिक, १३ मार्च २०२४ : भारतीय रेल्वेच्या ८५ हजार करोड रुपयांच्या देशभरातील विविध विकास कामांच्या उद्घाटन आणि लोकार्पण सोहळ्या अंतर्गत आज नाशिक रोड रेल्वे स्थानक येथे तयार करण्यात आलेल्या ऑफ ट्रॅक रेल कोच रेस्टॉरंटचे उद्घाटन माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीद्वारे संपन्न झाले. या कार्यक्रमाला केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार या उपस्थित होत्या.

यावेळी वन स्टेशन वन प्रोडक्ट स्टॉल असलेल्या कारागिराच्या पैठणी व विविध उत्पादनाच्या स्टॉलचेही उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमाला मध्य रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी, पदाधिकारी आणि रेल्वे कर्मचारी उपस्थित होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी : नाना आहिरे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा