अनोखे तंत्र वापरत आणि कीर्तन करत घेतले भरघोस पीक

शिंदखेडा, धुळे, २ फेब्रुवारी २०२४ : धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यात कुरुकवाडे गावातील एक छोटा शेतकरी विठ्ठलाचे कीर्तन करून शेती करतात आणि त्यांचे म्हणणे आहे की आपण जर निष्ठेने आणि कष्टाने शेती केली तर आपली धरती माय आपल्याला नाराज करत नाही.

संजय पंडित मोरे या शेतकऱ्याने आपल्या शेतात परभणी मोती दादरचे उत्पन्न घेतले. दादर या पिकाची उंची जवळपास नऊ ते दहा फूट एवढी आहे आणि कणसालाही खूप भरघोस दाणे आहेत. या पिकाला पाणी कमी प्रमाणात लागते. तीन ते चार पाण्यात हे पीक तीन महिन्यात लाखोंचे उत्पन्न देऊन जाते. त्यांचे म्हणणे आहे कि, शेतकऱ्याने जर शेणखताचा वापर जास्तीत जास्त केला तर रासायनिक खताचा वापर आपल्याला कमीत कमी करावा लागतो म्हणून त्यांनी शेणखताचा वापर केला आणि त्यांना फायदा झाला. यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यातून जो चारा निघतो तो गुरांना कामात येतो आणि जो पालापाचोळा त्याचा खतासाठी चांगला वापर होतो. हे तंत्र वापरत आणि विठ्ठलाचे कीर्तन करत त्यांनी भरघोस पीक घेतलं आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : भाग्यश्री बागुल

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा