विकीर…

                                                 आजच का तिची आठवण आली ?

  ‘ मुलींना मुलगी असल्याचा फायदा होतो ‘ हा माझा समज एका  रिक्ष्यावाल्याने खोडून टाकला. स्त्री-पुरुष समानता निदान  तिथे तरी लागू होत होती. माझ्या  आजूबाजूला इतक्या सुंदर मुली रिक्ष्याची वाट बघत होत्या त्यांना नाही म्हणणारा  रिक्ष्यावाला मला जरा देखील मुजोर वाटला नाही.  हेडफोन्स काळाची गरज असल्यासारखे रिक्ष्याची वाट बघणाऱ्या प्रत्येकाच्या कानात दिसत होते.  शेवटी चमत्कार झाला, शाळेच्या दिवसांपासून जिच्या मागे  लागलेलो तिचंच  स्थळ लग्नासाठी  याव तसं रिक्ष्यावाल्याने मलाच विचारलं,        ” एम आय डी  सी ? ” मी पण हो अशी मान हलवत  ( आणि लिहिलय तितकं सरप्राईस चेहऱ्यावर न दाखवता) रीक्ष्यात बसलो. 
         मला गुटखा खाणारी माणस आवडत नाहीत पण का काय माहित मला गुटखा खात बोलणाऱ्या रिक्ष्यावाल्यांशी बोलायला आवडत. काही शब्द कळत नाहीत तेव्हा डोक्यावर ताण द्यायला आवडत मला. काही तरी टॉपिक निघावा अस वाटत होत, इतक्यात त्याने सिग्नल वर थांबताच फोन बाहेर काढला, काहीतरी केल आणि गाणी लावली. ते गाण ऐकल आणि परत पटलं माझ नशीब नक्कीच माझ्या सोबत       ‘कॉमेडी सर्कस- कॉमेडी सर्कस ‘ खेळतय. खूप वर्ष्यांपूर्वी रीक्ष्यात, बसमध्ये , जय कानिफनाथ लिहलेल्या जवळपास सगळ्याच उसाच्या रसांच्या दुकानात ते गाणं सारख वाजत होत, डोक फिरायचं माझ, तेच गाणं आज परत जुन्या खपल्या काढत होत. ” कितनी  बैचेन होके तुम से मिली … तुमको क्या थी खबर… ” आयच्या गावात… भेन्डी  चार पाच शिव्याच आल्या तोंडात…  का त्या रिक्ष्यावाल्याने मलाच येउन विचारलं … माझ नशीब पण ना … कपिल शर्मा इतकाच राग येतो मला माझ्या नशिबाचा!
          बर झाल राज फिल्म रिलीज झालेली तेव्हा मी प्रेमात नव्हतो कोणाच्या… त्या गाण्याचे लीरीक्स मला माझ्या  लव स्टोरीशी जुळवायचे नव्हते. तेव्हा  एक बुक पब्लिश झाल होत, I TOO HAD A LOVE STORY. 
नंतर नंतर लव स्टोरी इतकी SAD  झाली कि नंतर नंतर च्या सगळ्या SAD SONGS ची लीरीक्स माझ्यासाठीच लिहलीत अस वाटायचं मला.  
          कुठेतरी  हरवलो मी,  राज च्या गाण्यापेक्ष्या माझी  बेचैनी सॉलीड  वाटत होती मला… पुढचा  सिग्नल आला, पुढच्या गाण्याच्या लाईन्स ऐकल्या , ” तेरे बिन जीना जीना जीना अब मुझको नही जीना , जुदाई वाला आसू अब मुझको है पिना…” आईची जय … ह्याच्यातर … कुठून  कुठून गाणी शोधून आणलेली ह्याने … 
बिल्डींगखाली आल्या वर पैसे देताना विचारलं – भैया रातभर रिक्षा चालते हो क्या ?
तो – हां जी सर , आपको कैसें पता  चला  ?
मी – ऐंसे ही , लगा मुझे… 
त्याने सुट्टे  द्यायला हात पुढे केला, हातावर  Tatoo केला होता, म्हणजे नाव गोंदल होत ,” शिला “
मी – बिवी का नाम… 
त्याच्या हातावरच्या नावाकडे बोट करत  विचारलं मी 
तो – नही, गर्लफ्रेन्ड थी शादी से पेहले , नही हुआ हमारा   म्हणत मस्त हसला तो …
मी पण चिल्लर खिश्यात टाकत  बिल्डींग कडे वळलो वळलो… 
रिक्ष्या जाता जाता वाजणार गाणं होत , ” बाहोंके दर्मियान दो प्यार मिल रहे  है …”
च्यायला हे गाण मला पण आवडत होत… परत नशिबाला एक शिवी घातली… 

जिना चडताना तेच गान गुणगुणत होतो…

कधीतरी मोबाईल मध्ये  तिच्या  नावाने प्ले लीस्ट सेव केली  होती … 

आताच्या प्ले-लीस्टच नाव होत … मिस यू 

                                                                         क्रमश:

                                                                                                © अविनाश उबाळे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा