नवी दिल्ली, ९ फेब्रुवरी २०२१: कोरोना महामारीविरुद्ध सुरु असलेल्या लढ्यात भारताने जागतिक पातळीवर काल आणखी एक शिखर सर केले. देशभरात ६० लाख लाभार्थ्यांचे लसीकरण करून भारत जगातील सर्वात वेगाने लसीकरण करणारा देश ठरला आहे. भारताने हे यश अवघ्या २४ दिवसांमध्ये प्राप्त केले आहे. हा टप्पा गाठण्यासाठी अमेरिकेला २६ तर इंग्लंडला ४६ दिवस लागले होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १६ जानेवारी २०२१ रोजी देशव्यापी लसीकरण कार्यक्रमाला सुरुवात केली होती तर २ फेब्रुवारी पासून आघाडीवरील कामगारांच्या लसीकरणाला सुरुवात करण्यात आली.
एकूण १,२४,७४४ सत्रांद्वारे राबविलेल्या मोहिमेत कोविड – १९ प्रतिबंधक लस घेतलेले आरोग्य सेवा कर्मचारी तसेच पहिल्या फळीतील कर्मचारी अशा सर्वांचा विचार केला तर काल संध्याकाळी ६ वाजेपर्यंत भारताने ६० लाखांचा आकडा पार केला आहे. यामध्ये ५४,१२,२७० आरोग्य सेवा कर्मचारी आहेत तर ६,२३,३९० पहिल्या फळीतील कर्मचारी आहेत.
काल, देशव्यापी कोविड-१९ विरोधी लसीकरण मोहिमेच्या २४ व्या दिवशी, संध्याकाळी ६ वाजेपर्यंत एकूण २,२३,२९८ लाभार्थ्यांना लस देण्यात आली. आतापर्यंत, लसीकरणामुळे झाल्याचा संशय घेता येईल अशी कोणत्याही गंभीर स्वरुपाच्या प्रतिक्रियात्मक घटनेची अथवा मृत्यूची नोंद झालेली नाही.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे