इराक: कोरोना रुग्णालयात ऑक्सिजन टँक मध्ये स्फोट, ८२ जणांचा मृत्यू

बगदाद, २६ एप्रिल २०२१: कोरोनानं संपूर्ण जगात खळबळ उडविलीय, लोक ऑक्सिजनच्या अभावामुळं त्रस्त आहेत. इराक देखील यापासून वेगळा नाही, परंतु ऑक्सिजनशी संबंधित अशी एक घटना घडली आहे ज्यामध्ये ८२ लोकांचा बळी गेलाय. वास्तविक कोविड रुग्णालयाच्या ऑक्सिजन टाकीत झालेल्या स्फोटात ८२ लोकांचा मृत्यू झालाय.

एवढंच नव्हे तर या अपघातात ११० हून अधिक लोक गंभीर जखमी झाले आहेत. इराकच्या गृहमंत्रालयाच्या म्हणण्यानुसार राजधानी बगदादमधील इब्न अल-खतिब कोव्हिड १९ रुग्णालयात ऑक्सिजन टाकीमध्ये मोठा स्फोट झाला. यामुळं तिथं उपचार घेत असलेल्या ८२ रुग्णांचा मृत्यू झाला. या घटनेची पुष्टी मीडिया व गृह मंत्रालयानंही केलीय.

अहवालानुसार रुग्णालयातील अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळं स्फोट झाला व तेथे आग लागली. मिळालेल्या माहितीनुसार, इब्न अल-खतीब हॉस्पिटलच्या कोरोना वॉर्डात ऑक्सिजन सिलिंडरमध्ये स्फोट झाला. इराकच्या पंतप्रधानांनी घटनेसाठी जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांना तातडीनं काढून टाकलं.

कोविड रुग्णालयात जेव्हा हा अपघात झाला तेव्हा कोरोना विषाणूची लागण झालेल्या कमीतकमी २८ गंभीर रुग्ण व्हेंटिलेटरवर होते. इराकच्या स्वतंत्र मानवाधिकार आयोगाचे प्रवक्ता अली अल-बयाती यांनी ही माहिती दिली.

अपघाताचा व्हिडिओ दर्शविला गेला आहे ज्यात अग्निशमन दलाचे जवान आग विझवत आहेत आणि रुग्णांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करीत आहेत. मागील अनेक वर्षापासून इराकमध्ये संघर्ष आणि अशांतता होती. ह्या काळात इराक से मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. त्यामुळं रुग्णालय आणि बेड ची कमतरता इराकमध्ये प्रकर्षानं जाणवत आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा