गरमागरम वरण-भात आणि वरून तुपाची धार. सुटले ना लगेच तोंडाला पाणी. प्रत्येकाला वरण-भात-तूप खायला आवडते. खाद्य पदार्थांमध्ये तेलापेक्षा तुपाचा वापर करावा, असे म्हटले जाते. तुपाचे आरोग्यासाठी नेमके काय फायदे आहेत, जाणून घेऊयात.
शरीराला मिळते ऊर्जा
तुपामध्ये अशा प्रकारचं फॅटी असिड असतं, ज्यामुळे शरीराचं वजन वाढत नाही, तर शरीराला ऊर्जा मिळते. ज्यांची कामं अंगमेहनतीची आहेत, शारीरिक कार्य जास्त करावी लागतात, त्यांना ऊर्जा भरपूर प्रमाणात लागते. त्यामुळे अशा व्यक्तींनी तुपाचं सेवन करावं.
अॅलर्जी कमी होते
तुपातील दुग्धजन्य घटक काढून टाकलेले असतात. त्यामुळे ज्यांना लॅक्टोज इन्टोलरन्सची समस्या आहे किंवा जे लोक बटर खाऊ शकत नाहीत, अशा व्यक्ती तुपाचे सेवन करू शकतात. तुपामुळे पोटासंबंधी सामान्य समस्या सहसा उद्भवत नाहीत.
इन्फ्लेमेशन कमी होतं
तुपामध्ये . Butyric acid असते. एका अभ्यासानुसार इन्फ्लेमेशन कमी करण्यात तूप मदत करते. पूर्वीपासूनच इन्फ्लेमेशनवर औषध म्हणून तुपाचा वापर केला जातो.
डोळ्यांसाठी फायदेशीर
तुपामध्ये व्हिटॅमिन ए असते. जे डोळ्यांना संरक्षण देते. तसेच केरोटेनॉईड्स हे अँटिऑक्सिडंट डोळ्यातील पेशींना हानी पोहोचू देत नाहीत. त्यामुळे मोतीबिंदूसारख्या डोळ्यांच्या समस्या उद्भवत नाहीत.
रोगप्रतिकारक शक्ती वाढते
तुपामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते, आजारांशी लढण्यासाठी ताकद मिळते.