पुणे, ८ डिसेंबर २०२२ : डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या फर्ग्युसन महाविद्यालयात (स्वायत्त) औषध निर्मिती क्षेत्रात आंतरराष्ट्रीय स्तरावर आघाडीवर असणाऱ्या लुपिन कंपनीच्या सहकार्याने ‘ॲडव्हान्सड् बायोटेक्नॉलॉजी’ हा सहा महिन्यांचा पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे.
फर्ग्युसनची गौरवशाली शैक्षणिक परंपरा आणि लुपिनची उद्योगक्षेत्रातील अनुभवसिद्धता याचा विद्यार्थ्यांना विशेष फायदा होणार आहे. जानेवारी 2023 पासून हा अभ्यासक्रम सुरू होईल. एम. एस्सी., बी. एस्सी. आणि बी. टेक उत्तीर्ण विद्यार्थी प्रवेशासाठी पात्र असतील. http://www.fergusson.edu या संकेतस्थळावर प्रवेश प्रक्रियेची सविस्तर माहिती उपलब्ध आहे.
फर्ग्सुसन आणि लुपिन यांच्यात या संदर्भातील सामंजस्य करार नुकताच करण्यात आला. प्राचार्य डॉ. रविंद्रसिंग परदेशी आणि लुपिनच्या एचआर उपाध्यक्षा अरनाबी मरजित यांनी स्वाक्षऱ्या केल्या. डॉ. सोनाली जोशी, डॉ. धनश्री गोडबोले, डॉ. संजय तिवारी, स्वप्निल जोशी यांची प्रमुख उपस्थिती होती.
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.