अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ आयोजित ब्राह्मण क्रिकेट लीग २०२४ चे उदघाटन

पुणे, १३ जानेवारी २०२४ : अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ आयोजित ब्राह्मण क्रिकेट लीग २०२४ चे आज दिनांक १३ जानेवारी रोजी दिमाखदार पद्धतीने उदघाटन झाले. धावपळीच्या जीवनात युवकांमध्ये खेळाची भावना रुजली जावी, पर्यायाने अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे कार्य लोकांपर्यंत पोहचावे हा या स्पर्धेचा मुख्य उद्देश आहॆ. या उदघाटनात पदाधिकाऱ्यांच्या हस्ते स्पर्धेची क्रिकेट जर्सीचे अनावरणही करण्यात आले. पुण्यातील आठ संघ यात सहभागी झाले असून माजी रणजी खेळाडू, प्रतिष्ठित मंडळी, अनेक युवक प्रतिनिधी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. पुढील तीन आठवडे ही ब्राह्मण क्रिकेट लीग वाघोली व मुकुंदनगर या दोन ग्राउंड्स वर सुरू राहणार असून ४ फेब्रुवारी रोजी अंतिम सामना खेळला जाईल.

मुकुंदनगर तेथील कटारिया क्रिकेट ग्राउंड वर अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ गोविंद कुलकर्णी यांच्या हस्ते स्पर्धेचा शुभारंभ करण्यात आला. ब्राह्मण क्रिकेट लीगचे हे पहिलेच वर्ष आहॆ, पुढील वर्षी ३२ संघ यात सहभागी होतील व अनेक महिला क्रिकेट संघांना यात सहभागी करुन घेण्यात येईल, या स्पर्धेद्वारे सुमारे २०० पेक्षा जास्त युवक महासंघाशी जोडले जातील व देशपातळीवर अनेक खेळाडू घडावे तसेच या युवकांच्या क्रिकेट कौशल्यला पुढे नेण्यासाठी महासंघाच्या वतीने विशेष प्रयत्न केले जातील असे प्रतिपादन डॉ गोविंद कुलकर्णी यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात केले.

यावेळी श्री सत्यजीत कुलकर्णी, पुणे जिल्हा अध्यक्ष श्री मंदार रेडे, जिल्हाध्यक्षा महिला आघाडी सौ केतकी कुलकर्णी, गुरुनाथ कुलकर्णी, सुनील शिरगांवकर, अशोक भंडारी, लक्ष्मीकांत धडफळे हे सर्व पदाधिकारी आवर्जून उपस्थित होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी : मंदार रेडे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा