आपल्या विधानानंतर राहुल गांधींनी साधला उद्धव ठाकरेंशी संवाद

नवी दिल्ली, दि. २७ मे २०२०: काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी शिवसेना नेते आणि महाराष्ट्र सरकारमधील मंत्री आदित्य ठाकरे यांच्याशी संवाद साधला. राहुल यांनी आपले वक्तव्य स्पष्ट करताना सांगितले की, एमव्हीए सरकार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमवेत काँग्रेस आहे. याची पार्श्वभूमी अशी आहे की राहुल गांधी यांनी असे विधान केले होते की महाराष्ट्रात काँग्रेस निर्णय घेण्याच्या भूमिकेत नाही. या विधानानंतर गोंधळ उडाला.

मात्र, आम्ही उद्धव सरकारच्या पाठीशी आहोत, असे वक्तव्य महाराष्ट्र काँग्रेस नेत्यांनी तत्काळ केले. यानंतर सर्व मित्रपक्ष एकत्र असून महाराष्ट्र सरकार स्थिर असल्याचेही शिवसेनेने म्हटले आहे. आता राहुल गांधी यांनी आदित्य ठाकरे यांच्याशी बोलून सर्व प्रकारच्या अफवा थांबविल्या आहेत.

काय आहे संपूर्ण प्रकरण

महाराष्ट्रातील कोरोनाच्या वाढत्या ग्राफवर राहुल गांधींनी मंगळवारी सांगितले की आम्ही महाराष्ट्रातील सरकारला पाठिंबा देत आहोत पण निर्णय घेण्यास सक्षम नाही. आम्ही पंजाब-छत्तीसगड-राजस्थानमध्ये निर्णय घेण्यास सक्षम आहोत. ज्या ठिकाणांचा आपापसात जास्त गुंतागुंती आहे त्या ठिकाणी कोरोना जास्त आहे. म्हणूनच मुंबई-दिल्लीमध्ये अधिक प्रकरणे आहेत. महाराष्ट्रालाही केंद्र सरकारची मदत मिळाली पाहिजे. आम्ही केवळ केंद्र सरकारला सूचना देऊ शकतो, परंतू सरकारला काय वाटते यावर अवलंबून आहे.

राहुल गांधी यांच्या विधानानंतर, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि उद्धव सरकारमधील मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले होते की, काँग्रेस आणि महा विकास आघाडीच्या (एमव्हीए) इतर पक्षांमध्ये कोणताही फरक नाही. काँग्रेस नाराज नाही. आम्ही सर्व आठवड्यातून एकदा भेटू आणि भेटत ही असतो.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा