माढा तालुक्यातील ८२ ग्रामपंचायतीवर प्रशासकाची नेमणूक

माढा, ८ नोव्हेंबर २०२०: या नोव्हेंबर अखेरीस माढा तालुक्यातील ८२ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाची मुदत संपत असून त्यामुळे या ग्रामपंचायतीवर आता प्रशासक म्हणून पंचायत समितीचे विस्तार अधिकारी जिल्हा परिषद शाळांचे केंद्रप्रमुख अंगणवाडी पर्यवेक्षिका कृषी अधिकारी आरोग्य पर्यवेक्षक इत्यादी प्रशासकीय कर्मचाऱ्यांची प्रशासक म्हणून या ग्रामपंचायतींवर निवड झाली आहे. जगभरात कोरोनाचा हाहाकार माजला आहे. त्यामुळे अनेक निवडणूका व प्रशासकीय कामे यात्रा जत्रा विवाह समारंभ यासारखे गर्दी एकत्र होणारे प्रसंग टाळण्याच्या उद्देशाने राज्य सरकारकडून ग्रामपंचायतींचा निवडणुकीचा प्रोग्राम पुढे ढकलण्यात आला त्यामुळे या नोव्हेंबर अखेरीस ज्या ग्रामपंचायतीची मुदत संपत आहे त्या ग्रामपंचायतीचा कारभार पाहण्यासाठी त्यांच्या गावच्या लोकप्रतिनिधींची मुदत संपल्याने त्या ठिकाणी आता प्रशासक नेमून ग्रामपंचायतचा कारभार निवडणुका होईपर्यंत प्रशासका कडून हाकण्यात येणार आहे.

या ग्रामपंचायतींवर प्रशासक म्हणून स्थानिक प्राधिकरणातील सरकारी अधिकारी किंवा सरकारी कर्मचारी यांची नेमणूक करण्यात आली आहे. माढा तालुक्यातील नोव्हेंबर अखेरीस मुदत संपणाऱ्या ८२ ग्रामपंचायतींवर २३ प्रशासकीय अधिकाऱ्यांची कर्मचाऱ्यांची प्रशासक म्हणून नेमणुका करण्यात आल्या आहेत. आता ग्रामपंचायतीवर प्रशासक येणार म्हणून तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतींमध्ये झालेल्या मोठ्या प्रमाणावरील भ्रष्टाचाराचे पितळ उघडे पडणार की काय त्यामुळे ग्रामसेवक व सरपंच यांचे धाबे दणाणले असून संबंधित प्रशासकांना गाठून त्यांची मनधरणी व सलगी करण्यासाठी खेड्यापाड्यातील सरपंच मंडळी व ग्रामसेवक पळापळी करताना दिसून येत आहेत. तर दुसरीकडे ८२ ग्रामपंचायतींवर २३ प्रशासक म्हणजे एका एका कडे पाच ते सहा ग्रामपंचायती येणार मग गावचा कारभार कसा चालणार असाही प्रश्‍न निर्माण होत आहे.

या महिन्यात मुदत संपणाऱ्या माढा तालुक्यातील कोणत्या ग्रामपंचायतीवर कोण ग्राम प्रशासक असेल ते पहा:

१) जाधव वाडी (मो), बैरागवाडी, आरण या ग्रामपंचायतींवर प्रशासक म्हणून केंद्रप्रमुख विलास काळे

२) कुर्डू ,महादेववाडी, ढवळस, उपळवाटे, शेडशिंगे, या ग्रामपंचायतीवर विस्ताराधिकारी पी. आर. लोंढे

३) मोडनिम ,कुंभेज ,वाकाव, विठ्ठलवाडी, लोंढेवाडी, वडाचीवाडी ,खैरेवाडी, रणदिवेवाडी , या ग्रामपंचायतींवर प्रशासक म्हणून विस्ताराधिकारी डी.जी. सुतार

४) बारलोणी, गवळेवाडी, अकुलगाव, लहू, निमगाव , बादलेवाडी, शिराळ अ, या ग्रामपंचायतींवर विस्ताराधिकारी डी.बी.मराठे

५) उपळाई बुद्रूक, उपळाई खुर्द, वडाचीवाडी, या ग्रामपंचायतीवर प्रशासक म्हणून केंद्रप्रमुख दिगंबर काळे

६) तसेच कोंढार भागातील रुई, आलेगाव बुद्रुक, आलेगाव खुर्द, टाकळी (टें), रांजणी, गार अकोले, ग्रामपंचायत वर प्रशासक म्हणून- विस्ताराधिकारी गावडे हे काम पाहणार आहेत

७) अकोले बुद्रुक ,लवूळ ,घोटी, परितेवाडी, परिते, आणि सापटणे(टें ) या ग्रामपंचायतीवर प्रशासक म्हणून विस्ताराधिकारी बी. टी. रेपाळ

८) बेंबळे हरीनगर, अकोले खुर्द. नगोर्ली. सुर्ली ,शिराळा टे ,दहिवली या ग्रामपंचायतीवर विस्ताराधिकारी ए बी ढवळे.

९) उंदरगाव, मानेगाव, केवड चव्हाणवाडी मा, या ग्रामपंचायतीवर विस्ताराधिकारी बि.एम.शिंदे

१०) बावी, सोलंकरवाडी,या ग्रामपंचायत वर केंद्रप्रमुख सुभाष दाढे

११) भूताष्टे, ग्रामपंचायतीवर केंद्रप्रमुख सुभाष लोंढे

१२) मिटकलवाडी, माळेगाव ,शेवरे, या ग्रामपंचायतीवर अंगणवाडी पर्यवेक्षिका अर्चना खटके

१३) अंजनगाव उ, जामगाव, सुलतानपूर, ग्रामपंचायतींवर केंद्रप्रमुख कापसे

१४) शिंदेवाडी, सापटणे भो, वेताळवाडी, पर्यवेक्षिका योगिता लोखंडे

१५) तांदुळवाडी वडाचीवाडी (त.म) जाधव वाडी (मा), या ग्रामपंचायतींवर केंद्रप्रमुख खातूनबी आतार

१६) रिधोरे, चिंचगाव, तडवळे म, पापनस, या ग्रामपंचायतींवर कृषी अधिकारी संभाजी पवार

१७) तांबवे (टे), चव्हाणवाडी (टे) , पर्यवेक्षिका लता पाटील

१८) धानोरे, खैराव, पाचफुलवाडी, कापसेवाडी, हटकरवाडी, बुद्रुकवाडी, या ग्रामपंचायतींवर आरोग्य पर्यवेक्षक एन एस चव्हाण

१९) भोळेवाडी, जाखले, कव्हे, बिटरगाव ह, या ग्रामपंचायतीवर पर्यवेक्षिका सविता गडहिरे

२०) वरवडे, उजनी मा., होळी खुर्द, ग्रामपंचायतींवर पर्यवेक्षिका आशा मगर

२१) महादपुर, निमगाव मा या ग्रामपंचायतींवर अंगणवाडी पर्यवेक्षिका रतन शिंदे

२२) पालवण बॉम्बे या ग्रामपंचायतीवर पर्यवेक्षिका उमा साळुंखे

२३) आहेरगाव भोइंजे फुटजवळगाव या ग्रामपंचायतींवर विस्ताराधिकारी पोतदार अशाप्रकारे ग्रामपंचायतींवर प्रशासकांच्या नियुक्ती करण्यात आलेले आहेत.

कोरनाचा कहर पाहता अजूनही या ग्रामपंचायतींची निवडणूक घेणे शक्य नाही. जरी कार्यक्रम जाहीर झाले असले तरी लवकर निवडणुका होणार नाहीत. त्यामुळे ग्रामपंचायतींचा कारभार सुरळीत चालावा व गावागावातील सोयीसुविधा अखंडित रहाव्यात म्हणून या प्रशासकांच्या निवडी करण्यात आले आहेत असे गटविकास अधिकारी पंचायत समिती कुर्डूवाडी संताजी पाटील यांनी सांगितले.

न्यूज अनकट प्रतिनिधी- प्रदीप पाटील

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा