सुरेखा भोसले यांना भारत सेवा रत्न गोल्ड मेडल अवार्ड जाहीर..!

उरुळी कांचन, १७ डिसेंबर २०२०: पुणे जिल्हा उरुळी कांचन ता. हवेली जि. पुणे या ठिकाणी सुरेखा ताई यांनी बचत गट तसेच भूमी जनशक्ती किसान महासचिव या संघटनेत फार मोठं योगदान देऊन महिला सशक्तिकरणाचा फार मोठा आदर्श घडून दाखविला आहे. अत्यंत गरिबी हलाखीचं जीवन जगत सुरेखा ताईंनी आपला आपल्या कुटुंबाचा आदर्श ठेवत गाव, राज्य तसेच देशात आपला ठसा उमटविला व मराठी युक्तिवादा प्रमाणं ‘जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगा उद्धरी’ या शब्दाला साजेसं असं कर्तुत्व यांनी करून दाखविलं आहे.

महिला सशक्तिकरण याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे सुरेखाताई यांच्या जीवनात अनेक अडचणी अनेक प्रसंग आले. परंतु, त्यांनी न डगमगता दुःखाचा डोंगर पार करून यशाची शिखर गाठलं. पारधी समाज म्हटलं की लोकांच्या भावना वेगळ्या होतात, त्यातही समाजात वावरताना लोक वेगळ्या दृष्टिकोनातून पाहतात. परंतु, या कुटुंबानं त्याची पर्वा न करता समाजाचं नाव लौकिक करण्यासाठी अहोरात्र पणे रात्रंदिवस एक करून नवा इतिहास घडविला आहे.

त्यांच्या या कार्याला भविष्यात महिलांसाठी सुरेखा ताई या एक प्रेरणा ठरणार आहे. तरी जास्तीत जास्त महिलांनी तरुणींनी सुरेखा ताईंचा आदर्श घेऊन आपल्या जीवनाचं साफल्य करून घ्यावं व सुरेखा भोसले यांना औरंगाबाद जिल्हा पत्रकार तसेच मराठवाडा विभाग व महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ हवेली यांच्या वतीनंही शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ज्ञानेश्वर शिंदे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा