वाघोली (पुणे), दि. २६ जुलै २०२०: वाघोली येथे आज सकाळी ९ वाजता १ कोटी, १० लाख रु. निधीच्या विकास कामाचे भूमिपूजन करण्यात आले. जशी वाघोलीची लोकसंख्या अधिक गतीने वाढत चालली आहे त्याच गतीने वाघोली मध्ये विकास कामे होत आहेत. वाघोलीतील ग्रामपंचायतीच्या माध्यमातून ग्रामस्थांना रस्ते, पाणी, वीज, आरोग्य, अशा सर्व सोयी – सुविधा आणि विविध योजनांचा लाभ मिळत आहे. तसेच गावातील विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी आणि गावातील लोकप्रतिनिधी यांच्या प्रयत्नामुळे विकास कामांमध्ये कोणताही अडथळा येता नाही, विकासकामे अधिक गतीने सुरू आहेत. अशा मोठ्या विकास कामामुळेच वाघोलीची प्रगतीकडे वाटचाल सुरू असल्याचे प्रतिपादन वाघोलीचे माजी उपसरपंच तथा वाघोली विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र सातव पाटील यांनी केले.
वाघोली येथे वार्ड क्रमांक दोन मधील रोज गार्डन सोसायटी अंतर्गत ड्रेनेज लाईन, पिण्याच्या पाण्याची लाईन आणि रस्ता कॉंक्रिटीकरण, करणे अशा १ कोटी १० लाख रुपये कामांचे भूमिपूजन वाघोलीचे माजी उपसरपंच राजेंद्र सातव, सरपंच वसुंधरा उबाळे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष रामभाऊ दाभाडे, यांच्या शुभ हस्ते पार पडले. याप्रसंगी माजी सरपंच शिवदास उबाळे, माजी उपसरपंच कैलास जाधव, ग्रामपंचायत सदस्या अर्चना कटके, सुधीर भाडाळे, महेंद्र भाडाळे, वंदना दाभाडे, तंटामुक्तीचे माजी अध्यक्ष बाळासाहेब सातव, तसेच रोज गार्डन मधील सर्व ग्रामस्थ उपस्थित होते.
वाघोली मध्ये ग्रामपंचायत पीएमआरडीए यांच्या माध्यमातून जास्तीत जास्त विकासकामे झाली असून तसेच मंजूर झालेली विकासकामेही सुरू आहेत. तसेच यापुढेही शिरूर – हवेलीचे आमदार अशोक पवार यांच्या माध्यमातूनही अनेक विकासकामे वाघोली मध्ये होणार आहेत. वाघोली विकसित करणे हेच आमचे प्रमुख ध्येय असल्याचे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य तथा वाघोलीचे माजी सरपंच रामभाऊ दाभाडे यांनी सांगितले आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ज्ञानेश्वर शिंदे