भाजपचे २८ जणांवर गुन्हा दाखल

कर्जत, दि. २ ऑगस्ट २०२०: भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष व माजी मंत्री प्राध्यापक राम शिंदे यांच्यासह २८ जणांवर आज कर्जत पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. 
   
संपूर्ण महाराष्ट्रात महाविकास आघाडी विरुद्ध भाजपाने एल्गार आंदोलन पुकारले असताना माजी मंत्री प्रा. राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली कर्जत तालुक्यातील माहिजळगाव येथे दि.  १ ऑगस्ट रोजी भाजपाच्या अनेक कार्यकर्त्यांबरोबर रस्त्यावर दगडाला दुग्धाभिषेक घालत आंदोलन केले. यामुळे कर्जत पोलीस स्टेशनमध्ये पो. कॉ. मनोज लातूरकर यांच्या फिर्यादीवरून प्रा. राम शिंदे, यांच्यासह प्रसाद ढोकरीकर, अंगद ढोकरीकर, अशोक खेडकर बाळासाहेब देशमुख, राजेंद्र गायकवाड, बाबासाहेब निंबाळकर, प्रकाश शिंदे, सुरेश भिसे, भानुदास हाके, किशोर कोपनर, रावसाहेब कदम, प्रकाश कदम, मच्छिंद्र खेडकर, सतीश शिंदे, संतोष घोडके, सतीश काळे, कल्याण जाधव, पप्पू शिंदे, बाळासाहेब भंडारी, आप्पा कदम, राजेंद्र शिंदे, रमेश व्हरकटे, शरद जाधव, बापू शिंदे, नंदलाल काळदाते, विजय भोसले, अशोक शिंदे या २८ व्यक्तींविरुद्ध अहमदनगर जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्या अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
       
भादवि कलम ३४१, १८८, २६९, २७० व भारतीय साथरोग अधिनियम १८९७ चे कलम २, ३, ४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादीत म्हटले आहे की पोलिस निरीक्षक सुनील गायकवाड गोरेे दूध आंदोलनाच्या अनुषंगाने बंदोबस्त साठी गेले असता, अहमदनगर सोलापूर महामार्गावर माहिजळगाव चौक येथे राम शंकर शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या दुधाला भाव वाढवून द्यावा याकरिता माहिजळगाव या ठिकाणी अांदोलन केले.

आंदोलनाची कोणतीही परवानगी नसताना व जिल्हाधिकारी अहमदनगर यांच्या ३१ जुलै २०२० नुसार सी आर पी सी १४४ अनुसार महसूल स्थळ सीमेच्या हद्दीमध्ये कोणत्याही रस्त्यावर सार्वजनिक वाहतुकीचे रस्त्यावर गल्लोगल्ली याठिकाणी संचार वाहतूक फिरणे उभे राहणे थांबून सार्वजनिक ठिकाणी पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्ती एकत्र येण्यास मनाई असताना पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एकत्र आल्याने त्यांच्या विरुद्ध कर्जत पोलीस स्टेशन मध्ये फिर्याद दाखल करण्यात आली आहे

न्यूज अनकट प्रतिनिधी: जयहिंद पौरष

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा