हाथरस प्रकरणी सीबीआय’नं दाखल केली तक्रार,

लखनऊ, ११ ऑक्टोंबर २०२०: केंद्रीय अन्वेषण ब्युरो’नं (सीबीआय) हातरसातील सामूहिक बलात्कारानंतर दलित मुलीच्या हत्येप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. तसेच सीबीआय’नं याप्रकरणी तपास सुरू केला आहे. उत्तर प्रदेश सरकारच्या विनंतीवरून सीबीआय’नं गुन्हा दाखल केला आहे. सीबीआय’नं तपास सुरू करून यासंदर्भात एक टीम तयार केली आहे.

प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की, हाथरस प्रकरणातील एका आरोपीविरूद्ध गुन्हा दाखल करून सीबीआय’नं आज तपास सुरू केला. यापूर्वी पीडितेच्या भावानं हाथरसच्या चांदपा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. १४ सप्टेंबर २०२० रोजी आरोपींनी त्याच्या बहिणी सोबत बाजरीच्या शेतामध्ये अत्याचार करून मारहाण केली होती त्यामध्ये तिचा मृत्यू झाला.

सीबीआय’नं हाथरस प्रकरण आपल्या हातात घेतलं आहे. घटनेला सुमारे २७ दिवस झाले आहेत. आधी हाथरस पोलिस, त्यानंतर एसआयटी आणि आता सीबीआय’नं या प्रकरणात तपास सुरू केला आहे.

एसआयटी अद्याप या प्रकरणाची चौकशी करत होती. जेव्हा एसआयटी’नं १४ सप्टेंबर रोजी सत्य जाणून घेण्यासाठी तपास सुरू केला तेव्हा त्यांच्या निशाण्यावर गावातील ४० लोक होते. गावातील या ४० लोकांची चौकशी केली गेली आहे. हे ४० लोक असे आहेत जे १४ सप्टेंबर रोजी आसपासच्या शेतात काम करीत होते. यात आरोपी आणि पीडितेच्या घराचा समावेश आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा