दाट धुक्यामुळे चिकलठाणा विमानतळाला मोठा फटका; मुंबई, दिल्लीहून आलेल्या दोन्ही विमानांचे लँडिंग रद्द

औरंगाबाद, ६ जानेवारी २०२३ : उत्तर भारतातील थंडीची लाट आणि थंड वाऱ्यांचा परिणाम महाराष्ट्रातही दिसून येतोय. आज शुक्रवारी (ता. सहा) महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यांमध्ये सकाळच्या वेळी दाट धुकं दिसून आलं. त्यामुळे विमानाच्या प्रवासालाही अडथळे येत आहेत. औरंगाबाद विमानतळालाही याचा फटका बसला.

याविषयी अधिक माहिती अशी, की मुंबई आणि दिल्लीहून आलेली दोन्ही विमानं आज औरंगाबादेत उतरलीच नाहीत. मुंबईहून आज सकाळी औरंगाबादेत विमान आलं. अर्धा तास आकाशातच घिरट्या घातल्या आणि परत माघारी फिरले. वातावरणात दाट धुकं असल्याने औरंगाबाद विमानतळाला मोठा फटका बसला आहे. आज मुंबई आणि दिल्लीहून आलेल्या दोन्ही विमानांचे लँडिंग रद्द करण्यात आले. त्यामुळे प्रवाशांचे मोठे हाल झाले.

मुंबई आणि दिल्लीहून आलेली दोन विमानं औरंगाबादेत लँड होऊ शकली नाहीत. त्यामुळे प्रवाशांना पुन्हा मुंबई-दिल्ली गाठावी लागू शकते. तर हैदराबादमधून आलेलं एक विमान तब्बल एक तास आकाशात घिरट्या घालून अखेर औरंगाबादच्या धावपट्टीवर उतरविण्यात आलं.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सतीश पाटील

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा