चिमुकल्यांच्या कलाविष्काराला रसिकांची उत्स्फूर्त दाद

बारामती : येथे “युथ व्हिजन” या संस्थेने बारामती किड्स शो चे आयोजन केले होते या कार्यक्रमात मुलांनी आकर्षक विद्युत रोषणाई, बहुरंगी वेशभूषा, आणि चिमुकल्या कलाकारांचा रॅम्प वॉक सादर केला.
बारामती येथे झालेल्या लहान मुलांच्या कलाविष्कार त्याला मिळणार पालकांचा वाढता उत्साह यामुळे कार्यक्रम चांगला रंगात गेला कार्यक्रमाचे उद्घाटन बारामतीच्या नगराध्यक्ष पौर्णिमा तावरे यांनी केले.
कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण नाळ चित्रपटातील चैत्या, श्रीनिवास पोकळे उपस्थित होता. सिने अभिनेत्री पुनम कापसे, पुजा घाग याही कार्यक्रमाला उपस्थित होत्या. सागर कुडाळकर व प्रतीक ढाले यांच्या सुमधूर संगीताने श्रोत्यांची मने जिंकली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष विशाल मेहता यांनी केले तर संस्थेचे उपाध्यक्ष अतुल साबळे यांनी आभार मानले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रोहित किकले, प्रवीण बर्गे रामेश्वर मोरे, ऋषिकेश लोणकर, प्रशांत भागवत, पारस मेथा, रोहित शहा, करण भापकर, सुमित बेलसरे, रिकुल सोनी, दीपक गाणबोटे यांनी मोलाचे सहकार्य केले.
विजेते नाव- प्रथम क्रमांक-मायरा शेख,द्वितीय क्रमांक-गुरु उदावंत, तृतीय क्रमांक-शिवराज ननवरे, तर ओपन राऊंड- स्पृहा नलावडे, आदित्य धर्माधिकारी, अश्विनी जाधव यांनी जिंकला.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा