पुडुचेरी-तामिळनाडू समुद्रकिनाऱ्याला निवार चक्रीवादळाची धडक, जनजीवन विस्कळीत

तमिळनाडू, २६ नोव्हेंबर २०२०: मध्यरात्रीनंतर चक्रीवादळ निवारने तमिळनाडू आणि पुडुचेरीच्या समुद्रकिनार्‍यावर धडक दिली. यावेळी मुसळधार पाऊस व वारा होता. चेन्नई आणि कुडलोर, महाबलीपुरम यासह अनेक शहरांमध्ये जोरदार वारा आणि मुसळधार पाऊस कायम आहे. पुडुचेरी जोरदार वार्‍यासह जोरदार पाऊस पडत आहे. हवामान खात्याच्या माहितीनुसार, तामिळनाडूमधील कुडलोर येथे २५ नोव्हेंबर रोजी सकाळी ८.३० ते २६ नोव्हेंबर रोजी दुपारी १.३० वाजेपर्यंत पुडुचेरीमध्ये २२५ मिमी आणि कुडलोरमध्ये २४४ मिमी पावसाची नोंद झाली आहे. तामिळनाडूमध्ये एक लाख लोकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे.

पुडुचेरी येथील किनाऱ्याला चक्रवात निवारा’ने धडक दिली आहे. २५ नोव्हेंबर रोजी रात्री ११.३० ते २६ नोव्हेंबर रोजी दुपारी २.३० वाजेपर्यंत निवार’चे लँडफॉल झाले. यानंतर त्याचा वेग कमी होत आहे. आता त्याची श्रेणी धोकादायक चक्रीवादळाची (सीव्हीयर सायकलोनिक स्टॉर्म) आहे. पुडुचेरीपासून आता वाऱ्याचा वेग ताशी ६५ ते ७५ किमीपर्यंत कमी होईल.

तथापि, या वादळामुळे तामिळनाडू आणि पुडुचेरीमध्ये बरेच नुकसान झाले आहे. रात्र असल्यामुळे, बाधित भागाची योग्य चित्रे उपलब्ध नाहीत. परंतु पाऊस आणि वादळामुळे या परिसरातील जनजीवन ठप्प झाले आहे.

चक्रीवादळ निवार’चा वेग कमी

चक्रीवादळ निवार’चा वेग कमी झाला आहे. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार या वादळाची श्रेणी आता ‘अत्यंत तीव्र चक्रीय वादळ’ वरुन ‘तीव्र चक्रीय वादळ’ मध्ये बदलली आहे. यासह चक्रीवादळाचा वेगही कमी झाला आहे. या चक्रीवादळाची गती ताशी १०० किमी ते ताशी ११० किमी प्रति तासापर्यंत होती. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार हे चक्रीवादळ उत्तर व वायव्य दिशेने वाटचाल करतच राहिल आणि आणखी कमकुवत होईल.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा