मुंबईत आढळला झाडाला लटकलेला मृतदेह; हत्या की आत्महत्या? गूढ कायम

मुंबई, ७ जानेवारी २०२३ : मुंबईच्या जुहू परिसरात एका व्यक्तीचा मृतदेह झाडाला लटकलेला अवस्थेत आढळून आला आहे. पोलिसांनी मृतदेह खाली उतरवून ताब्यात घेतला आहे. हा मृतदेह आता वैद्यकीय तपासणी आणि शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे, अशी माहिती जुहू पोलिसांनी दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुलमोहर रोड ५ आणि ६ जवळील १५१ येथील मोकळ्या जागेवरील झाडावर हा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत होता. जुहू पोलिसांनी मृतदेह खाली उतरवून ताब्यात घेतला; तसेच विलेपार्ले पश्चिमेकडील महापालिकेच्या कुपर रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे.

आरीफ इसाक इरुस हाझी असे मृत व्यक्तीचे नाव असल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान, मृतदेहाची ओळख पटली असून ही हत्या आहे, की आत्महत्या? याबाबत शवविच्छेदन अहवालानंतरच माहिती मिळू शकणार आहे; मात्र परिसरात अशा पद्धतीने व्यक्तीचा मृतदेह आढळला असल्याने एकच खळखळ उडाली आहे; तसेच नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा