ठरले ! ट्विटरच्या सीईओ पदाचा राजीनामा देणार इलॉन मस्क; ट्विट करून सांगितले कारण

नवी दिल्ली, २० डिसेंबर २०२२ :जगातील दुसरी सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेले ट्विटरचे सीईओ इलॉन मस्क हे आपल्या पदाचा राजीनामा देणार आहेत. मात्र त्यासाठी त्यांनी एक अट घातली आहे. त्यांनी स्वतः ट्विट करत अशी माहिती दिली आहे.

ते आपल्या ट्विटमध्ये म्हणाले की, नोकरी घेण्याइतपत वेडा कोणी भेटला की मी सीईओ पदाचा राजीनामा देईन! त्यानंतर, मी फक्त सॉफ्टवेअर आणि सर्व्हर टीमचे काम बघेन, असेही त्यांनी स्पष्ट केले. दोन दिवसांपूर्वीच मस्क यांनी मी ट्विटरच्या सीईओपदावर राहु की नको, असा पोल घेतला होता. त्यात ५७ टक्के लोकांनी पद सोडा असे मत नोंदवले होते. तर ४२.५ टक्के लोकांनी राजीनाम्याच्या विरोधात मत दिले आहे.

टेस्लाचे सीईओ इलॉन मस्क यांनी ४४ अब्ज डॉलर्समध्ये ट्विटर विकत घेतल्यानंतर अनेक धक्कादायक निर्णय घेतले जात आहेत. अवघ्या काही दिवसांपूर्वी मस्क यांनी हजारो कर्मचाऱ्यांना नारळ दिला होता, त्यामुळे अनेकांसमोर रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला. मस्कच्या या निर्णयाविरोधात जगभरातून टीका देखील झाली होती.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा