पुणे पदवीधर मतदार संघासाठी वंचित बहुजन तर्फे प्रा. सोमनाथ साळुंखे

पुणे,१२ सप्टेंबर २०२०:पुणे पदवीधर मतदार संघ २०२० च्या निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने प्रा.सोमनाथ साळुंखे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड.प्रकाश आंबेडकर यांनी पंढरपूर येथील नुकत्याच झालेल्या मेळाव्यात प्रा. साळुंखे यांच्या उमेदवारीची घोषणा केली. या बाबतचे अधिकृत पत्र पार्टीच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आले आहे.

सॉफ्टवेअर इंजिनिअर असणाऱ्या प्रा.साळुंखे यांनी गरजू विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन कार्यक्रम राबवून उठावदार काम केले आहे. भारत सरकारचा नेहरू यूवा पुरस्कार प्राप्त असलेल्या प्रा.साळुंखे यांनी विविध संघटनांच्या माध्यमातून भरीव कामगिरी करून सामाजिक कामाचा ठसा उमटविला आहे. या जोरावरच पश्चिम महाराष्ट्रातील समस्त पदवीधर बांधवांनी पुणे पदवीधर मतदार संघातून निवडणूक लढवावी अशी आग्रही मागणी करण्यात आली होती. .

पदवीधरांच्या अनेक समस्या बेरोजगारीचा प्रश्न अशा अनेक प्रश्नासाठी प्रामुख्याने प्रा.साळुंखे यांनी काम उभे केले आहे या माध्यमातूनच पुणे पदवीधर मतदारसंघात सांगली जिल्ह्यासाठी प्रतिनिधित्व मिळाले आहे. समाजकारण आणि राजकारण यांची सांगड घालत अनेक सामाजिक प्रश्न तडीस नेण्यासाठी पदवीधरांचा आपल्या हक्काचा आपला माणूस म्हणून प्रा.साळुंखे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : ज्ञानेश्वरी आयवळे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा