इशान-ऋतुराजपेक्षा सरस कामगिरी असूनही, सरफराज खानला डावलले

नवी दिल्ली २५ जून २०२३: १२ जुलैपासून सुरू होणाऱ्या वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी, शुक्रवारी भारताचा कसोटी आणि एकदिवसीय संघ जाहीर करण्यात आला. यात देशांतर्गत क्रिकेटमधील अव्वल फलंदाज सरफराज खानला, क्रमांक तीनचे चे स्थान रिक्त असतानाही संघात स्थान देण्यात आले नाही. देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्याची सरासरी ८० आहे, तर इशान किशनची सरासरी ३८ आणि ऋतुराजची सरासरी ४२ असूनही त्यांना सरफराजच्या आधी कसोटी संघात संधी मिळाली.

सोबतच कसोटीतील सर्वोत्तम खेळाडू चेतेश्वर पुजारालाही संघातून वगळण्यात आले असुन त्याच्या जागी मुंबईचा सलामीवीर यशस्वी जैस्वाल आणि महाराष्ट्राच्या ऋतुराज गायकवाडला संधी मिळाली. परंतु पंचवीस वर्षीय सरफराज गेल्या तीन वर्षांपासून रणजी ट्रॉफी आणि देशांतर्गत क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी करतोय. त्याची संधी गेल्यामुळे आता निवडीबाबत चर्चा सुरू झाली आहे.

सरफराज खानने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी केली आहे. त्याने गेल्या रणजी मोसमात सहा सामन्यात ,९२.६६ च्या सरासरीने धावा केल्या. गेल्या तीन रणजी मोसमातही त्याने चमकदार कामगिरी केली. प्रथम श्रेणीत चांगल्या कामगिरीमुळे त्याला इंडिया-ए संघात संधी मिळाली, पण टीम इंडियामध्ये सामील होण्यासाठीची त्याची प्रतीक्षा अद्याप संपलेली नाही.

महाराष्ट्राचा सलामीवीर ऋतुराज गायकवाडचा कसोटी संघात समावेश करण्यात आला आहे. आकडेवारीनुसार सरफराज खान त्याच्यापेक्षा आणि यशस्वी जैस्वाल, ईशान किशनपेक्षा कितीतरी पटीने सरस आहे. ऋतुराज गायकवाडची प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये सरासरी ४२.१९ आहे. त्याच वेळी, सरफराजची सरासरी त्याच्या दुप्पट ७९.६५ आहे. कसोटी संघाला मधल्या फळीतील फलंदाजांची गरज आहे. सरफराज त्याचा प्रबळ दावेदार आहे. त्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये सर्व धावा मधल्या फळीत केल्या, त्यामुळे पुजाराच्या जागी तो क्रमांक-३ वर सर्वोत्तम पर्याय ठरला असता.

वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी भारतीय संघ,
भारतीय वनडे संघ: रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, ऋतुराज गायकवाड, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), शार्दुल ठाकूर, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, जयदेव उनाडकट, मोहम्मद सिराज, उमरान मलिक, मुकेश कुमार.

भारतीय वनडे संघ: रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, यशस्वी जैस्वाल, केएस भरत (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, जयदेव उनाडकट, नवदीप सैनी आणि इशान किशन (यष्टीरक्षक).

न्युज अनकट प्रतिनिधी- गुरुराज पोरे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा