जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी शिवारफेरीत केली कामांची पाहणी

बारामती ०४ फेब्रुवरी २०२१: बारामती तालुक्यातील सायबांचीवाडी येथे शिवारफेरीत श्रमदानातून केलेल्या बांधाची, मुरघास प्रकल्प व तलाव सुशोभीकरण व पाणी फाऊंडेशनच्या माध्यमातून करण्यात आलेल्या कामांची जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी बुधवारी पाहणी करून गावकऱ्यांनी व पाणी फाउंडेशनच्या कामाचे कौतुक केले.

जिल्हाधिकारी डॉ.देशमुख यांनी शिवारफेरी अंतर्गत केलेली कामे व पाणी फांऊडेशनच्या कामांची पाहणी केल्यावर झालेल्या बैठकीत ते बोलत होते. सायंबाचीवाडी येथील ग्रामस्थांनी पाणी फाऊंडेशन या संस्थेच्या मदतीने उल्लेखनीय कामे केली आहेत.सध्या पाण्याची पातळी जास्त असली तरी त्याचे योग्य जल व्यवस्थापन करून सातत्य राखणे आवश्यक आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पादन वाढून गाव समृध्द होईल. ग्रामस्थांनी एकत्रितपणे चांगले काम केले आहे.गावातील ग्रामस्थांच्या अडचणी प्रशासनाकडून सोडविण्यात येतील. मी सर्व ग्रामस्थांचे अभिनंदन करतो.तसेच समृध्दी गाव योजनेमध्येही भाग घेण्याचे त्यांनी आवाहन केले

यावेळी पाणी फांऊडेशनच्या प्रतिनिधी म्हणाले सन २०१८ -१९ मध्ये गावामध्ये उपलब्ध पाणी साठा १०६ .७७ कोटी लिटर होता. प्रत्यक्षात पाण्याची गरज होती २६९ .९२ कोटी लिटर एकूण १६३ .१५ कोटी लिटरची पाण्याची कमी होते. त्यानंतर गावाने २०१९ -२० मध्ये सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेमध्ये भाग घेऊन मशीन व श्रमदानातून केलेल्या २ कामाच्या माध्यमातून सुमारे ११ कोटी ४० लाख लिटर पाणी साठा तयार झाला.यानंतर उपलब्ध पाणी ४२५ .९५ कोटी लिटर साठा आणि पाण्याची गरज ३६९ .७८ कोटी लिटर म्हणजेच ५६ .१७ कोटी लिटर जास्त पाणीसाठा झाला. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विश्वास देवकाते,उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे,पाणी फाऊंडेशनचे राज्य मार्गदर्शक डॉ.अविनाश पोळ, गटविकास अधिकारी राहूल काळभोर, तालुका कृषी अधिकारी दत्तात्रय पडवळ, उपसरपंच प्रमोद जगताप, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

न्युज अनकट प्रतिनिधी – अमोल यादव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा