तुर्कस्ताननंतर आता न्यूझीलंडमध्ये जाणवले भूकंपाचे धक्के!

वेलिंगटन, १५ फेब्रुवारी २०२३ :पश्चिम आशियाई देश तुर्की आणि सीरियामध्ये झालेल्या विनाशकारी भूकंपानंतर आता ऑस्ट्रेलिया खंडाच्या दक्षिणेला असलेला न्यूझीलंड हा देशही भूकंपाने हादरला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी (१५ फेब्रुवारी) दुपारी न्यूझीलंडमध्ये ६.१ रिश्टर स्केलचा भूकंप झाला. हा भूकंप नॉर्थ आइसलँड शहर लोहार्टच्या वायव्येला ७८ किमी अंतरावर झाला आहे.

  • न्यूझीलंडमध्ये राष्ट्रीय आणीबाणी

न्यूझीलंडमध्ये ‘गॅब्रिएल’ चक्रीवादळाचा धोका आठवडाभरापासून कायम आहे. या चक्रीवादळामुळे अनेक शहरांमध्ये मुसळधार पाऊस आणि पूरस्थिती निर्माण झाली होती. परिस्थिती इतकी भीषण झाली की सरकारने काल राष्ट्रीय आणीबाणी जाहीर केली. येथील सहा भागात आणीबाणी लागू करण्यात आली आहे.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा