मुंबईत उभारणार चार नवे जम्बो कोव्हिड सेंटर

मुंबई, १२ एप्रिल २०२१: मुंबईत दररोज दहा हजार किंवा त्यापेक्षा जास्त नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण पडत आहे. कोरोनाबाधितांचा दररोज वाढता आकडा लक्षात घेऊन राज्य सरकार मुंबईत आणखी चार मोठे कोव्हिड सेंटर तयार करण्याच्या तयारीत आहे. मुंबईत ५३०० बेड तर ८०० आयसीयू बेड असलेले कोव्हिड सेंटर उभारले जाणार आहेत. याबाबत मुंबई महापालिकेचे महापौर किशोरी पेडणेकर यांनी माहिती दिली आहे. या कोव्हिड सेंटरमुळे आरोग्य विभागावरील ताण कमी होईल. तसेच मुंबईकरांनाही सुविधा उपलब्ध होतील, अशी माहिती महापौरांनी दिली.

हे कोव्हिड सेंटर MMRDA, CIDCO, MHADA, BMC यांच्याअंतर्गत उभारले जाणार आहेत.

१. मुंबईत कांजूरमार्ग येथे २००० बेड आणि २०० आयसीयू बेडचे जम्बो कोव्हिड सेंटर उभारले जाणार आहे. हे कोव्हिड सेंटर MMRDA द्वारे बांधण्यात येईल.

२. दुसरे जम्बो कोव्हिड सेंटर हे मालाड येथे CIDCO द्वारे उभारण्यात येणार आहे. या कोव्हिड सेंटरमध्येही २००० बेड आणि २०० आयसीयू बेड उभारले जाणार आहेत.

३. सोमय्या ग्राउंडवर म्हाडाच्या माध्यमातून कोव्हिड सेंटर उभारलं जाणार आहे. या कोव्हिड सेंटरमध्ये १००० बेड आणि २०० आयसीयू बेड असणार आहेत.

४. चौथा कोव्हिड सेंटर हा महालक्ष्मी येथे असणार आहे. या कोव्हिड सेंटरमध्ये ३०० बेड आणि २०० आयसीयू बेड असणार आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा