यामुळं नाकारलं गुप्तेश्वर पांडे यांचं तिकीट, अनिल देशमुख यांची प्रतिक्रिया

मुंबई, ८ ऑक्टोंबर २०२०: उत्तर प्रदेशचे माजी डीजीपी गुप्तेश्वर पांडे यांना जेडीयूनं तिकीट नाकारलं आहे. त्यामुळं गुप्तेश्वर पांडे यांना मोठा धक्का बसला आहे. सुशांत प्रकरणी महाराष्ट्र सरकार व मुंबई पोलिसांवर सातत्यानं टीका करून गुप्तेश्वर पांडे राजकीय वर्तुळात चर्चेत आले होते. गुप्तेश्वर पांडे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अशी विधानं देत होते. त्यामुळं त्यांची राजकारणात एंट्री होती की काय अशी चर्चा होऊ लागल्या होत्या आणि गुप्तेश्वर पांडे यांनी जेडीयू मध्ये प्रवेश करत आपला मनसुबा देखील स्पष्ट केला. मात्र, नुकत्याच जाहीर केलेल्या ११५ जणांचा यादीमध्ये गुप्तेश्वर पांडे यांचं नाव नसल्यानं सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे. यावर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी देखील आपलं भाष्य केलंय. ‘तेलही गेलं तूपही गेलं’ अशा शब्दात त्यांनी गुप्तेश्वर पांडे यांच्या स्थितीचं वर्णन केलंय.

दरम्यान गुप्तेश्वर पांडे यांनी तिकीट न मिळाल्यामुळं भावनिक होत एक पोस्ट देखील आपल्या फेसबूक अकाऊंटवर टाकली आहे. ते म्हणाले की, ‘शुभचिंतकांच्या फोननी मी हैराण झालोय, “त्यांची चिंता मी समजू शकतो. मी सेवामुक्त झाल्यानं निवडणूक लढवेन, अशी अनेकांची अपेक्षा होती. परंतु मी यावेळी निवडणूक लढवत नाही. माझं आयुष्य संघर्षमय होतं. मी जीवनभर जनतेची सेवा करत राहीन. कृपया संयम बाळगा आणि मला फोन करु नका.”

काय म्हणाले अनिल देशमुख

गुप्तेश्वर पांडे यांना बिहार विधानसभा निवडणुकीचं तिकीट देणं, हा संबंधित पक्षाचा (जेडीयू) विषय आहे. आम्ही विचारलं होतं की, (जेडीयूसोबत आघाडी असल्यामुळं) भाजप नेते त्यांचा प्रचार करणार का? याच प्रश्नाच्या भीतीपोटी पांडेंना तिकीट दिलं नसावं, असं अनिल देशमुख म्हणाले.

गुप्तेश्वर पांडे यांनी काही दिवसांपूर्वी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या उपस्थितीत जेडीयूमध्ये प्रवेश केला होता. बिहारचे पोलिस महासंचालक म्हणून व्हीआरसी घेतल्यावर पांडे राजकारणात प्रवेश करण्याच्या शक्यता वर्तवल्या जात होत्या, मात्र ते वारंवार फेटाळून लावत होते. अखेर या अटकळी खऱ्या ठरवत त्यांनी जेडीयूतून राजकारणात पाऊल ठेवलंच. त्यांचे सेवानिवृत्ती देखील अवघ्या पाच महिन्यांवर राहिली होती. मात्र राजकारणात प्रवेश करण्यासाठी त्यांनी पाच महिने अगोदरच सेवानिवृत्ती घेतली. गुप्तेश्वर पांडे फेब्रुवारी २०२१ मध्ये सेवानिवृत्त होणार होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा