आम्ही जेवढ्या लस उत्पादित करू त्यातील अर्धा हिस्सा भारताचा: अदार पूनावाला

नवी दिल्ली, २९ डिसेंबर २०२०: जगभरात कोरोनाच्या नव्या स्ट्रेनमुळे पुन्हा एकदा दहशत वाढली आहे. नव्या स्ट्रेनमुळे आता कोरोना लसची प्रसिद्धीही जोरात होऊ लागली आहे. दरम्यान, सोमवारी सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (एसआयआय) चे सीईओ अदार पूनावाला यांनी दावा केला आहे की, त्यांच्या कंपनीने तयार केलेल्या लसींपैकी निम्मे डोस फक्त भारतासाठी असतील.

पूनावाला यांनी एका संभाषणादरम्यान सांगितले की, २०२१ च्या सुरुवातीला ऑक्सफोर्ड-अ‍ॅस्ट्रॅजेनेका कोविड -१९ ही लस यूकेमध्ये वापरण्यासाठी परवाना मिळण्याची अपेक्षा आहे. ऑक्सफोर्ड-अ‍ॅस्ट्रॅजेनेका लसबाबत परवाना मिळण्यास उशीर झाला आहे याबाबत काही चिंता करण्यासारखे आहे का? असे विचारले असता पूनावाला म्हणाले की, “कोणत्याही प्रकारची चिंता करण्याची बाब नाही, आपल्याला नवीन वर्षात काहीतरी चांगली बातमी मिळावी याची अपेक्षा आपण सर्वांनी करायला हवी.”

पूनावाला पुढे म्हणाले, “भारत आणि यूके मधील नियामकांकडे आमच्यामार्फत सर्व डेटा सादर केला गेला आहे. आम्हाला खात्री आहे की डेटा लसची सुरक्षा आणि कार्यक्षमता दर्शवितो. पहिल्या डोस आणि दुसर्‍या डोसमध्ये अंतर आहे. भारतीय औषध नियामक देखील अशा अनेक कंपन्यांवर नजर ठेवून आहे ज्या कोविड -१९ लस विकसित करीत आहेत. ”

पूनावाला म्हणाले की, “याआधी बरेचसे लोक विचारत होते की आपण लस बनवण्याच्या शर्यतीत का उतरत आहोत. परंतु आता या उलट प्रश्न विचारले जात आहेत. भारताची औषध नियामक संस्था आधीपासूनच यावर चांगले काम करीत आहे.” सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ने ही लस(कोविशील्ड) बनवण्यासाठी एस्ट्राजेनेका आणि ऑक्सफोर्ड यूनिवर्सिटी यांच्यासोबत भागीदारी केली आहे.

पहिल्या सहा महिन्यात भासणार लसीचा तुटवडा

पूनावाला म्हणाले की, २०२१ च्या पहिल्या सहा महिन्यांमध्ये जागतिक स्तरावर लसीबाबत तुटवडा देखील जाणवू शकतो. याबाबत ते पुढे म्हणाले की, “पहिल्या सहा महिन्यांमध्ये लसीची कमतरता भेडसावणार आहे परंतु या पासून कोणीही वाचवू शकणार नाही. परंतु आपण ऑगस्ट-सप्टेंबर २०२१ पर्यंत यामध्ये थोडासा दिलासा मिळताना पाहू शकतो. कारण इतर लस उत्पादक कंपन्या देखील लसीचा तुटवडा भरून काढण्याचा प्रयत्न करतील किंवा सक्षम असतील.”

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा