पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर गणपती विसर्जना दिवशी अवजड वाहनांना प्रवेश बंदी

पुणे, २६ सप्टेंबर २०२३ : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर दररोज हजारो प्रवासी प्रवास करत असतात. या महामार्गावर शनिवारी आणि रविवारी अनेकदा वाहतुकीची कोंडी होते. त्याचबरोबर सार्वजिनक सुट्या असल्या की महामार्गावर वाहने वाढतात. यामुळे वाहनधारकांना नेहमी वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. आता ही वाहतूक कोंडी लक्षात घेऊन प्रशासाने महत्वाचा निर्णय घेतला आहे. या काळात अवजड वाहनांसाठी हा मार्ग २४ तासांपेक्षा जास्त वेळ बंद राहणार आहे.

२८ सप्टेंबर रोजी गणपती विसर्जन आणि ईदच्या पार्श्वभूमीवर पुणे मुंबई एक्स्प्रेसवर मोठे बदल करण्यात आले आहेत. या महामार्गावर वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले आहेत.पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर गुरुवारी २८ तारखेला अवजड वाहनांना प्रवेश बंदी असणार आहे. २८ सप्टेंबर रोजी राज्यभरात गणेश विसर्जनाच्या मिरवणुका निघणार आहेत. त्यामुळे एक्स्प्रेस वेवर सुद्ध वाहतुकीची समस्या निर्माण होऊ नये म्हणुन अवजड वाहनांना हा महामार्ग बंद राहणार आहे.

बुधवारी २७ तारखेला मध्यरात्री १२ पासून द्रुतगती मार्गावर अवजड वाहनांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे. ही प्रवेश बंदी २९ तारखेला रात्री १२ वाजेपर्यंत राहणार असणार आहे. गणपती विसर्जन आणि ईद एकाच दिवशी आल्याने प्रशासनाकडून खबरदारी घेत हा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे या काळात अवजड वाहनांना जुन्या मार्गाचा पर्याय असणार आहे.यामुळे जुन्या मार्गावर वाहनांची गर्दी वाढण्याची शक्यता आहे.

पुण्यातही गणपती विसर्जन आणि ईदच्या दिवशी लाखो नागरिक बाहेर पडतात. त्यामुळे पुणे शहरात वाहतुकीची कोंडी निर्माण होऊ शकते. त्यामुळे पुणे शहरात २८ तारखेपर्यंत मोठ्या आणि अवजड वाहनांना बंदी करण्यात आली आहे.ही बंद २४ तास असणार आहे. या काळात जड वाहनांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन पुणे वाहतूक विभागाकडून करण्यात आले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा