भारत आणि चिनी सैन्य मागे सरकण्यास सुरुवात, चीनचा दावा

बीजिंग, ११ फेब्रुवरी २०२१: चीनच्या राष्ट्रीय संरक्षण मंत्रालयाचा (चायना मिनिस्ट्री ऑफ नॅशनल डिफेन्स) असा दावा आहे की सैन्य कमांडर स्तरावर चर्चेच्या ९ व्या फेरीनंतर संमितीवरील कार्यास सुरुवात झाली आहे. पँगोंग तलावाच्या उत्तर आणि दक्षिण सीमेवरून चिनी सैन्य आणि भारतीय सैन्यात मागे हटण्यास सुरुवात झाली आहे.

चिनी वृत्तपत्र ग्लोबल टाईम्सने चीनच्या संरक्षण मंत्रालयाच्या हवाल्याने सांगितले की, बुधवारी लष्करी चर्चेत करार झाल्यानंतर चीन आणि भारतीय सैन्य दलाच्या जवानांनी दक्षिण व उत्तर पँगोंग त्सो तलावावरून परत जाण्यास सुरवात केली आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, सहमती नुसार फिंगर ४ च्या दोन्ही बाजूंनी पेट्रोलिंग होणार नाही. फिंगर ४ हा नो पेट्रोलिंग झोन म्हणून घोषित केला आहे. हे टप्प्याटप्प्याने करावे लागेल. आता चिनी सैन्य फिंगर ८ कडे परतत आहे आणि भारतीय सेना धनसिंग थापा पोस्ट (फिंगर २ ते फिंगर ३) कडे जात आहे.

दोन देशांमधील तणाव गेल्या वर्षी मे महिन्यात सुरू झाला होता. कारण चीनच्या सैन्याला पँगोंग तलावावर आपला दावा वाढवायचा होता. यावेळी दोन्ही सैन्यांमध्ये चकमकही झाली.

१५ जून २०२० रोजी, चीनी सैन्याने गलवान व्हॅलीमध्ये गस्त घालण्यासाठी गेलेल्या भारतीय सैन्यावर विश्वासघात करत हल्ला केला. या हल्ल्याला भारतीय सैन्याने चोख प्रत्युत्तर दिले. या हल्ल्यात भारताच्या २० सैनिकांनी बलिदान दिले. बरेच चिनी सैनिक मारले गेले, चीनने हे मान्य केले, परंतु मारल्या गेलेल्या सैनिकांच्या संख्येबाबत चीन गप्प राहिला.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा