तिसऱ्या टी-२० मध्ये भारताने वेस्ट इंडिजचा केला पराभव, सूर्यकुमार यादव ‘प्लेअर ऑफ द मॅच

पुणे, ९ ऑगस्ट २०२३ : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील तिसरा सामना मंगळवार, ८ ऑगस्ट रोजी प्रोविडेन्स स्टेडियम, जॉर्जटाउन, गयाना येथे खेळला गेला. वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. ५ गड्यांच्या मोबदल्यात १५९ धावा केल्या आणि भारताला विजयासाठी १६० धावांचे लक्ष्य दिले.

भारतीय संघाने विजयासाठी १६० धावांचे लक्ष्य १७.५ षटकांत ३ गडी गमावून १३ चेंडू शिल्लक असताना पूर्ण केले. कर्णधार हार्दिक पंड्याने षटकार मारून सामना जिंकवला. तो १५ चेंडूत १ षटकार आणि एका चौकाराच्या मदतीने २०* धावांवर नाबाद राहिला. भारत आणि वेस्ट इंडिजची ही मालिका आतापर्यंत ३ सामन्यांनंतर ५ सामन्यांच्या मालिकेत २-१ अशी बरोबरीत आली आहे.

भारताकडून सूर्यकुमार यादवने ४४ चेंडूंत १० चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने ८३ धावांची शानदार खेळी केली. तिलक वर्माने ३७ चेंडूत ४ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने नाबाद ४९* धावा केल्या. सूर्यकुमार यादवला त्याच्या शानदार फलंदाजीसाठी WI vs IND तिसरा टी-२० प्लेयर ऑफ द मॅच म्हणून निवडण्यात आले. विशेष म्हणजे या मालिकेत आतापर्यंत खेळल्या गेलेल्या ३ सामन्यांपैकी वेस्ट इंडिजने सलग २ सामने जिंकले होते. तर या मालिकेतील वेस्ट इंडिजचा विजय रथ तिसऱ्या सामन्यात भारताने रोखला.

न्यूज अनकट प्रतिनिधी : सूरज गायकवाड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा