नवी दिल्ली, ४ नोव्हेंबर २०२०: भारत, अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलियाच्या मलबार नौदल युद्ध सरावाचा पहिला टप्पा मंगळवारपासून सुरू झाला आहे. भारतीय नौदलानं बंगालच्या उपसागरात तीन देशांसह संयुक्त सराव सुरू केलाय. या सरावाचं नाव आहे मलबार -२० (२४ आवृत्ती) फेज १.
इंडियन नेव्ही, यूएस नेव्ही, जपान मेरीटाइम सेल्फ डिफेन्स फोर्स आणि रॉयल ऑस्ट्रेलियन नेव्ही यांनी या व्यायामात भाग घेतला. नौदलाच्या या युद्ध अभ्यासात भारतीय रणविजय, शिवालिक, शक्ती, सुकन्या यांनी भाग घेतला, तर पाणबुडी सिंधुराजने ही समुद्रात आपली शक्ती दर्शविली.
अमेरिकेचे यूएसएस जॉन एस मॅककॅन, ऑस्ट्रेलियाचे एचएएमएस बालारत आणि जपानच्या जेएस ओनामी यांच्यासह जहाजं आणि पाणबुडी यांनी समुद्रावर त्यांची लढाई कौशल्ये जगाला दाखवून दिली. समुद्रावर पाणबुडीविरोधी युद्ध ऑपरेशन्स, क्रॉस डेक लँडिंग आणि विविध प्रकारचे संयुक्त सराव केले गेले.
हा सराव या चार देशांमधील सामरिक संबंध दर्शवितो. हा लष्करी अभ्यास तीन दिवस चालेल व शुक्रवारी सपेल. गेल्या आठवड्यात, भारताने जाहीर केले की ऑस्ट्रेलिया देखील या अभ्यासाचा एक भाग असेल, ज्यास अमेरिकेने सहमती दर्शविली.
चीनच्या वाढती अक्रमकतेला आळा घालण्यासाठी अमेरिका क्वाड’चं समर्थन करत आहे. ज्यात भारत, जपान, अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया यांचा समावेश आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे