पर्यावरणप्रेमी संस्थांच्या मदतीने कल्याण-डोंबिवली महापालिकेने केले १७१ टन निर्माल्य संकलन

कल्याण-डोंबिवली, ११ सप्टेंबर २०२२: गतवर्षीच्या तुलनेत अधिक निर्माल्य तयार झाले असले तरी, घनकचरा विभागाचे उपायुक्त अतुल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शुक्रवारी महापालिकेने घनकचरा व्यवस्थापन विभाग, पर्यावरण प्रेमी संस्था यांच्या मदतीने निर्माल्य गोळा करण्यात आले. ठिकठिकाणी विसर्जन घाटावर निर्माल्य व्यवस्थापनाकरिता विविध उपाययोजना करण्यात आल्या होत्या. त्यातून विसर्जन स्थळी एकूण १७१ टन निर्माल्य जमा झाले.

जमा केलेले निर्माल्य  डोंबिवली येथील श्री गणेश मंदिर संस्थान, एमआयडीसी येथील खत प्रकल्प, आयरे बायोगॅस प्रकल्प, कचोरे बायोगॅस प्रकल्प, उंबर्डे बायोगॅस प्रकल्प येथे देण्यात आले.

निर्माल्य खाडी, नदी या मध्ये न टाकल्यामुळे मोठ्या प्रमाणात पर्यावरणास फायदा झाला आहे. या उपक्रमास नागरिकांचा व श्री गणेश मंडळांचा देखील उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

महानगरपालिकेने विसर्जन स्थळांवर फायर ब्रिगेड, स्वयंसेवक, रबरबोट इत्यादी साहित्य सज्ज ठेवले होते. त्याचप्रमाणे विसर्जन स्थळे व विसर्जन मार्गावर १६८ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची व २४५५ हॅलोजनची व्यवस्था करण्यात आली होती. श्री गणेशोत्सवादरम्यान प्रकाश व्यवस्थेसाठी विहित क्षमतेचे एकूण ६७ जनरेटर, ८८ लाइटिंग टॉवर विद्युत विभागामार्फत बसविण्यात आले होते. त्यामुळे निर्माल्य संकलन करण्यास सहकार्य झाल्याचे स्वयंसेवकांनी सांगितले.

न्युज अनकट प्रतिनिधी : गुरूराज पोरे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा