कोलकत्ता मधील बेलूर मठ येथून नरेंद्र मोदी यांचे तरुणांना संबोधन

कोलकत्ता: स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बंगालमधील बेलूर मठात तरुणांना संबोधित करताना ते म्हणाले की जगात तरुणांची लोकसंख्या भारतात सर्वाधिक आहे आणि ज्या मोहिमेमध्ये भारतीय तरुण सामील होतात ती मोहीम निश्चितच यशस्वी होते. नागरिकता दुरुस्ती कायद्यावर (सीएए) पंतप्रधान मोदी म्हणाले की, तरुणांच्या मनात प्रश्न निर्माण झाले आहेत. काही तरुण सीएएबद्दल संभ्रमित आहेत. ते म्हणाले, ही तरूणांची विचारसरणी आहे की समस्यांना टाळू नका, समस्या सोबत संघर्ष करा व त्या सोडवा.

बेलूर मठ येथे विद्यार्थ्यांना संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले, नागरिकांनी नागरिकत्व दुरुस्ती कायद्यात पसरलेला गैरसमज दूर केला पाहिजे. सीएए हा नागरिकत्व काढून घेण्याचा नसून नागरिकत्व देण्याचा कायदा आहे. पंतप्रधान म्हणाले की हा कायदा एका रात्रीत बनवला गेलेला नाही. उलट, या कायद्यात संसदेच्या माध्यमातून केवळ एक सुधारणा करण्यात आली आहे. तरुणांविषयी ते म्हणाले, एकविसाव्या शतकातील या दशकात भारताला परिवर्तनासाठी युवा उत्कटता, युवा ऊर्जा हीच आधार आहे.

तरुणांना संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले की, आपल्याला स्वामी विवेकानंद यांनी सांगितलेले एक वाक्य लक्षात ठेवले पाहिजे ते असे की, “जर मला १०० ऊर्जावान युवक मिळाले तर मी भारत देश बदलवुन टाकेल”. याचा अर्थ असा की भारतातील तरुणांची ऊर्जाच या देशाचे भवितव्य घडवण्यासाठी प्रभावशाली आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा